LAC वर चीनची छोट्यात छोटी कृतीही रेंजमध्ये येणार कारण...

भारताच्या ताफ्यात येतय एक घातक अस्त्र
america drone
america drone

नवी दिल्ली: भारताला इस्रायलकडून लवकरच चार अत्याधुनिक हेरॉन मार्क-२ (Heron-II drone) ड्रोन मिळणार आहेत. सलग ४५ तास उड्डाण करण्याची या ड्रोनची क्षमता आहे. या ड्रोन्समुळे चीनला लागून असलेल्या नियंत्रण रेषेजवळ (LAC) भारताची टेहळणी करण्याची क्षमता कैकपटीने वाढणार आहे. पहिली दोन मानवरहित हेरॉन मार्क-२ ड्रोन विमाने पुढच्या दोन ते तान महिन्यात भारतीय लष्कराकडे सोपवली जातील. (India to soon get four advanced Israeli drones for surveillance along the LAC)

वर्ष अखेरपर्यंत अन्य ड्रोन्स मिळतील. इस्रायलकडून भाडेत्तत्वार ही ड्रोन्स भारताला मिळणार आहेत. चीनला लागून असलेल्या ३,४८८ किमीच्या सीमारेषेवर सॅटलाइट कम्युनिकेशनमध्ये सक्षम असलेल्या या ड्रोन्सद्नारे बारीक लक्ष ठेवता येईल. सैन्यदलांना इमर्जन्सीमध्ये ५०० कोटी रुपयापर्यंत खर्च करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्याच अधिकाराचा वापर करुन तीन वर्षाच्या भाडेकरारावर इस्रायलकडून ही चार हेरॉन मार्क-२ ड्रोन्स घेण्यात येणार आहेत.

america drone
चॅलेंजिंग ऑपरेशन, नौदलाच्या वीरांनी सांगितला समुद्रातील थरार

नौदल आधीपासूनच दोन MQ-9B सी गार्डीयन ड्रोन्सचा वापर करत आहे. MQ-9B हे प्रीडेटर ड्रोनचा एक प्रकार आहे. हिंदी महासागरात टेहळणीसाठी या ड्रोन्सचा वापर करण्यात येतो. हेरॉन मार्क-२ ही हेरॉन UAV ची पुढची आवृत्ती आहे. हेरॉन UAV चा भारतीय लष्कराकडून अनेक वर्षांपासून वापर सुरु आहे. "लांब पल्ल्याचे रडार, सेन्सर्स, अँटी-जँमिंग टेक्निक आणि ३५ हजार फूट उंचीपर्यंत पोहोचण्याची क्षमता, यामुळे सीमारेषेजवळ न जाताही हेरॉन मार्क-२ ड्रोन सर्व माहिती गोळा करु शकते" असे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com