Jahangirpuri Violence : मिरवणुकीला परवानगी नव्हती, पोलिसांनी दिली माहिती

Jahangirpuri Violence
Jahangirpuri Violencee sakal

नवी दिल्ली : जहांगीरपुरी येथे शनिवारी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत हिंसाचार (Jahangirpuri Violence) झाला. यामध्ये दगडफेक देखील करण्यात आली. पण, या मिरवणुकांना कुठलीही परवानगी नव्हती, असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मिरवणुकांच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jahangirpuri Violence
हुबळी हिंसाचार :12 पोलीस जखमी, 40 जणांना अटक

जहांगीरपुरीच्या सी ब्लॉक परिसरात मिरवणूक (Jahangirpuri Violence) पुढे घेऊन जाणाऱ्या आयोजकांविरोधात जहांगरीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांना ताब्यात घेतलं असून एका आरोपीची चौकशी सुरू आहे, असं दिल्ली पोलिस उपायुक्त उषा रंगनानी यांनी सांगितले. तसेच पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदेच्या सदस्य प्रेम शर्माला चौकशीसाठी बोलावले होते.

हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी आणि दुपारी काढण्यात येणाऱ्या दोन शोभायात्रांचा मार्ग सारखाच होता. त्यामुळे मिरवणुकीत हिंसाचार झाला. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी मशिदीत घुसून भगवे झेंडे फडकविण्याचा कोणताही प्रयत्न केला, असे आरोप खोटे आहेत, असं पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितलं होतं.

नेमकं प्रकरण काय?-

जहांगीरपुरी हिंसाचार इतका भयंकर होता, की एकमेकांवर दगडफेक आणि काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. एका गटाने काचेच्या बाटल्या फेकल्या तर दुसऱ्या गटाने दगडफेक केली. परिसरातील कुशल सिनेमासमोर सी-ब्लॉकमध्ये झोपडपट्टी आहे. येथे राहणारे लोक कचरा उचलून उदरनिर्वाह करतात. त्यामुळेच या परिसरात भंगार स्वरूपात काचेच्या बाटल्या होत्या. त्याच बाटल्यांचा वापर करण्यात आला. तसेच वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली. घटनास्थळी मशीद आणि मंदिराजवळ विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. त्याअंतर्गत बॅरिकेडिंग करून रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच दुकान उघडण्यास परवानगी नाही. परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com