भारत-चीन यांच्यात डोकलाम प्रश्नी लवकरच निघेल तोडगा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

"मला खात्री आहे की चीन सकारात्मक हालचाली करेल आणि यावर लवकरच तोडगा निघेल."

नवी दिल्ली : डोकलाम येथे भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेल्या पेचावर लवकर तोडगा निघेल. चीन याबाबत सकारात्मक पाऊल उचलेल, अशी आशा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली. 

इंडो तिबेटन सीमा पोलिसांच्या (ITBP) वतीने आयोजित एका कार्यक्रमात राजनाथसिंह बोलत होते. 
"मला खात्री आहे की चीन सकारात्मक हालचाली करेल आणि यावर लवकरच तोडगा निघेल. भारताला शांतता हवी आहे असा संदेश आपण शेजारी देशांना देऊ इच्छितो. मात्र, आमच्या भूभागांचे रक्षण करण्याची पूर्ण क्षमता आमच्या सुरक्षा फौजांमध्ये आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. 

जम्मू-काश्मीर ते अरुणाचल प्रदेश या दरम्यान सुमारे 4057 किलोमीटर लांबीच्या भारत-चीन सीमेचे रक्षण ITBP चे सैनिक करतात. भारतीय सैन्याने सिक्कीम येथील डोकलाम भागात चिनी लष्कराला रस्ते बांधण्यापासून रोखल्याने भारत-चीन दरम्यान खडाजंगी सुरू झाली. 'आम्ही आमच्याच हद्दीत रस्ते बांधत होतो,' असा दावा चीनने केला. भारताने आपले सैन्य डोकलाम पठारावरून मागे घ्यावे, असे चीनचे म्हणणे आहे. डोकलाम हा आमचा भूभाग आहे असे भूतानचे म्हणणे आहे, तर चीनसुद्धा त्यावर दावा सांगत आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
राज्यभर संततधार 
मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!
बारामतीची साखर अन्‌ राज्यात पाऊस!
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
नकुशी बनली विश्‍वचषक विजेती
मुलीच्या येण्याने कुटुंब परिपूर्ण
केईएमच्या दारी नंदीबैलाची स्वारी