तुम्हीच व्हा की! काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा राहुल गांधींच्याच नावाची चर्चा

Rahul Gandhi Reaction on assembly election
Rahul Gandhi Reaction on assembly election file photo

नवी दिल्ली : पाच राज्यांतील दारुण पराभवानंतर दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची काल बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत पाच राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवावर आत्मचिंतन केलं करण्यात आलं. त्याचबरोबर या बैठकीत नेतृत्वबदलावर देखील चर्चा करण्यात आली. कारण या बैठकीच्या आधीच काही चॅनेलवर गांधी कुटुंबिय काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देणार असल्याची बातमी प्रसारित करण्यात आली होती, ज्याचं खंडन काँग्रेसने लगेचंच केलं. मात्र, या बैठकीत नेतृत्वाबाबत चर्चा झाली असून पुन्हा एकदा राहुल गांधींच्याच नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा झाली. (Congress Working Committee meeting begins meeting started)

Rahul Gandhi Reaction on assembly election
दणदणीत पराभवाचं होणार मंथन; सोनिया गांधींच्या नेतृत्वात आज काँग्रेसची बैठक

राहुल गांधींनी पक्षाचं अध्यक्षपद सांभाळायला हवं, असं मत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मांडत चर्चेला तोंड फोडलं. गहलोत म्हणाले की, गांधी कुटुंब हे काँग्रेसच्या एकतेसाठी महत्त्वपूर्ण असून राहुल गांधींनीच पक्षाचं अध्यक्षपद सांभाळायला हवं. पुढे एएनआयसोबत बोलताना गहलोत यांनी म्हटलंय, "राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष व्हायला हवं. गेल्या तीन दशकांत काँग्रेस पक्षाचा कोणताही सदस्य पंतप्रधान अथवा मंत्रीपद भूषवलेलं नाहीये. गांधी कुटुंब काँग्रेसच्या एकतेसाठी महत्त्वपूर्ण आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे." असंही त्यांनी म्हटलं आहे. डीके शिवकुमार आणि इतर अनेक नेत्यांनीही हाच सूर ओढून धरला.

Rahul Gandhi Reaction on assembly election
...तर आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार; सोनिया गांधींनी केलं स्पष्ट

'सोनिया गांधींनी पद सांभाळावं'

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय की, "पाच राज्यांमधील निवडणुकीचा पराभव हा पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र, जोवर काँग्रेसची संस्थात्मक निवडणूक होत नाही तोवर सोनिया गांधी यांच्याकडूनच पक्षाचं नेतृत्व करण्यात यावं, यावर पक्षातल्या अनेक नेत्यांचं एकमत आहे. पुढे ते म्हणाले की, सोनिया गांधींनीच पुढे येऊन पक्षाचं नेतृत्त्व सक्षमपणे करावं. तसेच काही आवश्यक आणि व्यापक बदल करावेत, अशी विनंती त्यांच्याकडे काँग्रेसच्या कार्यसमितीनं केली आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर सगळ्यांना विश्वास आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, G23च्या सदस्यांनी तर गांधी परिवाराव्यतिरिक्त व्यक्तीला अध्यक्षपदी बसवण्याची मागणी केली असून यासाठी मुकूल वासनिक यांच्या नावाची शिफारिसही केली आहे. पण अशा प्रकारे काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन दोन गट पडल्यानं पक्ष श्रेष्ठींसाठी याबाबत निर्णय घेणं अवघड असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com