जेडीएसच्या आमदाराचे काँग्रेसला मतदान, म्हणाले - आय लव्ह इट

राज्यसभा निवडणूक : जेडीएसच्या आमदाराचे काँग्रेसला केले मतदान
Rajya Sabha Election 2022
Rajya Sabha Election 2022esakal

बंगळूरु : राज्यसभेच्या १६ जागांसाठी चार राज्यांमध्ये आज शुक्रवारी (ता.दहा) मतदान होत आहे. राजकीय पक्षांनी घोडेबाजार होऊ नये म्हणून आपापले आमदार हाॅटेल आणि रिसाॅर्टमध्ये ठेवले आहे. दुसरीकडे कर्नाटकात उघडपणे विरोधी मतदानाचा (Cross Voting) प्रकार समोर आला आहे. वास्तविक श्रीनिवास गौडा (K Srinivasa Gowda) आणि श्रीनिवास गुब्बी यांच्यासह कमीत-कमी दोन जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदारांनी शुक्रवारी कर्नाटकमध्ये चार जागांसाठी होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) काँग्रेसला मतदान केले. राज्यात क्राॅस व्होटींग महत्त्वपूर्ण आहे. कारण एका जागेसाठी मुख्य विरोध पक्ष काँग्रेस आणि जद (स) दरम्यान एक जबरदस्त लढत पाहायला मिळत आहे. (Rajya Sabha Election Two JDS MLA Voted For Congress In Karnataka)

Rajya Sabha Election 2022
राज्यसभा निवडणूक : मविआ-भाजपची प्रतिष्ठा पणाला

दोन्ही पक्षांनी भाजपला हरवण्याचा पण केला आहे. जद (स) आमदार श्रीनिवास गौडा जेव्हा विधानसभा परिसरातून बाहेर पडत होते, तेव्हा त्यांना विचारण्यात आले की त्यांनी कोणाला मतदान केले? यावर ते म्हणाले, मी काँग्रेसला (Congress Party) मतदान केले. जेव्हा त्यांना विचारले गेले की असे का केले? त्यावर गौडा म्हणाले, कारण आय लव्ह काँग्रेस (मला काँग्रेस आवडते). यापूर्वीच त्यांनी स्पष्ट केले, की ते एच.डी. कुमारस्वामींच्या नेतृत्वाखालील जद (एस) सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. जद(स) चे अध्यक्ष एच.डी.कुमारस्वामी म्हणाले, की पक्षाचे ३२ पैकी दोन आमदारांनी विरोधात जाऊन काँग्रेसला मतदान केले.

Rajya Sabha Election 2022
नियोजन की परिणाम?, भाजप नेते राम शिंदेंचा रोहित पवारांवर निशाणा

आमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष पक्षाचे समर्थन न करता काँग्रेसने भाजपला मजबूत केले आहे. आज संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल येण्याची आशा आहे. निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी, काँग्रेसचे विधानसभा नेते सिद्धारमैय्याने जदच्या (स) आमदारांना खुले पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मन्सूर अली खानच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. यात दोन्ही पक्षांच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा विजय होईल, असे म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com