रिलायन्स जिओ फोन - फ्री फ्री फ्री....

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जुलै 2017

- आयुष्यभर मोफत बोलता येणार
- नवीन फोनमध्ये 153 रुपयांमध्ये 'धन धना धन'
- अमर्यादित डेटा मिळणार 

मुंबई: भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांची पळता भुई थोडी  करणार्‍या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने सवलतींचा पेटारा उघडला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या होणार्‍या वार्षिक बैठकीदरम्यान रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी जिओ हा जगातील सर्वात स्वस्त फोन लॉन्च केला.

सर्वांना 'डेटा फ्रीडम' देण्याची घोषणा अंबानी यांनी केली आहे.  अंबानी हे आज (शुक्रवार) मुंबईत झालेल्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बोलत होते. 

जिओच्या फीचर फोनमध्ये काय मिळणार?

- सर्व जिओ अॅप्स अगदी मोफत असतील.
- लाइफटाईम फ्री कॉलिंग सुविधा 
- जिओचा फोन मोफत मिळणार
 - आयुष्यभर मोफत बोलता येणार
-  नवीन फोनमध्ये 153 रुपयांमध्ये धन धना धन'
- अमर्यादित डेटा मिळणार
- 1500 रुपयांचे 3 वर्षांसाठी सुरक्षा ठेव जमा करावे लागणार
- तीन वर्षानंतर सुरक्षा ठेव परत (रिफंड) मिळणार
- जिओच्या व्हॉईस कमांडिंग फोनमध्ये डिजिटल पेमेंट सुविधा
- जिओच्या फोनमध्ये असेल 22 भाषांचा समावेश

24 ऑगस्टपासून करता येणार प्रीबुक 

- जिओचा नवा स्मार्ट 4जी फोन 24 ऑगस्टपासून प्रीबुक करता येणार
- प्रत्येक आठवड्याला 5 लाख फोन ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाणार
- फोन 'मेड इन इंडिया' असतील

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: