ITBP
ITBPgoogle

ITBP : बारावी उत्तीर्णांना नोकरीची संंधी; पगार २५ हजार ते ९३ हजार रुपये

इच्छुक उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात.

मुंबई : Indo-tibetian border police (ITBP)मध्ये भरती सुरू करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल आणि साहाय्यक उपनिरीक्षक पदांवर भरती करण्यात येत आहे. एंट्री एंड लिमिटेड विभागीय प्रतियोगी परीक्षा (LDCE) द्वारे २८६ पदे भरली जाणार आहेत.

ITBP
माजी सैनिकांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कर्मचारी भरती

१५८ पदे हेड कॉन्स्टेबल पुरूष आणि ९० पदे हेड कॉन्स्टेबल महिला एलडीसीईसाठी भरली जाणार आहेत. २१ पदे एएसआय स्टेनोग्राफर आणि १७ एएसआय एलडीसीई पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज भरण्याचा कालावधी ८ जून ते ७ जुलै आहे.

ITBP
राज्यात लवकरच पोलिस भरती; भरली जाणार 7 हजार पदे

पात्रता

या पदांवर १२वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. हेड कॉन्स्टेबलसाठी इंग्रजीमध्ये ३० शब्द प्रतिमिनिट आणि हिंदीमध्ये ३० शब्द प्रतिमिनिट टायपिंग स्पीड आवश्यक आहे. एएसआयसाठी ८० शब्द प्रतिमिनिट, १० मिनिटांचे डिक्टेशन आणि संगणकावर इंग्रजीमध्ये ५० शब्द प्रतिमिनिट आणि हिंदीमध्ये ६५ मिनिटांचे ट्रान्स्क्रीप्शन आवश्यक आहे.

वयोमर्यादा

हेड कॉन्स्टेबल- १८ ते २५ वर्षे
हेड कांस्टेबल एलडीसीई - १८ ते ३५ वर्षे
एएसआई स्टेनो भर्ती - १८ ते २५ वर्षे
एएसआई स्टेनो एलडीसीई - १८ ते ३५ वर्षे

वेतन

हेड कॉन्स्टेबल: २५ हजार ते ८१ हजार १०० रुपये
एएसआई कॉन्स्टेबल: २९ हजार २०० ते ९३ हजार २०० रुपये

इच्छुक उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com