‘सेल्फी वुईथ गणपती’ची सोशल मीडियावर धूम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - सोशल मीडियावर आज दिवसभर ‘सेल्फी वुईथ गणपती’ची धूम जोरदार चालली. बाप्पा मोरयाऽऽ.. बरोबरच घरगुती गणपतींची छायाचित्रे, इमेजेस आज जोरदार हीट झाले. नैवद्यांसाठीचे खीर आणि उकडीचे तसेच रव्याचे मोदकही सोशल मीडियांवर चांगलेच घुमले. काहींनी गल्लीतील, सोसायटीतील आणि नवसाच्या गणपतींचे फोटोही व्हॉटस्‌ॲपवरून शेअर केली. 

आनंद घेऊन येणाऱ्या गणेशोत्सवाने सोशलमिडीयाही पुरेपुर व्यापून टाकला. घरोघरी विराजमान झालेल्या गणेशमूर्तींसोबतचे सेल्फी तरूण-तरूणींनी दिवसभर शेअर केले. अनेकांनी गणेशमुर्तीसह कुटुंबियांची छायाचित्रे अपलोड करून लाईक्‍स आणि हिटस्‌ घेतल्या. शिवाजी चौकातील नवसाला पावणारी २१ फुटी गणेशमुर्तीही आज मंडपात हजर झाल्याझाल्या त्याचीही छायाचित्रे कोल्हापूरकरांनी शेअर करत शहराची अस्मिताच अधोरेखित केली. कुंभार गल्लीपासून ते घरापर्यंत गणेशमूर्ती नेणाऱ्यांना मोफत सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांचीही येथे वाहवा झाली. 

तसेच या उत्सवाच्या शुभेच्छा देणाऱ्या संदेशांनी सोशल मिडीया रात्रीपर्यंत ओसंडून वाहिला. घरातील लक्षवेधी डेकोरेशनच्या छायाचित्रांचे कौतूकही झाले. काही सेलिब्रिटींनी स्वतः आरती करीत असल्याचे व्हीडिओ सर्वत्र शेअर केले.

रशिद पठाण यांची मोफत रिक्षा सेवा 
महालक्ष्मी पश्‍चिम दरवाजा रिक्षा स्टॉप येथील आरिफ रशिद पठाण यांनी मोफत सेवा दिली. त्यांच्या रिक्षाच्या क्रमांकासह त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन केले. ‘याला म्हणतात कोल्हापूर...’ अशा कमेंट्‌सह त्यांचे छायाचित्र दिवसभर शहरात व्हायरल झाले.