पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न - महापौर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पिंपरी - ‘‘शहरातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी निर्माल्य व मूर्तिदान स्वीकारण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे. महापालिकेच्या माध्यमातून आवश्‍यक सुविधा पुरविल्या जातील. घाटांच्या संख्येनुसार मूर्तिदानासाठी ट्रक उपलब्ध करून दिले जातील,’’ असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

शहरात साजरा होणारा गणेशोत्सव शांततामय व आनंदी वातावरणात पार पडावा, यासाठी महापालिकेतर्फे सामाजिक संस्थांच्या समवेत झालेल्या आढावा बैठकीत काळजे बोलत होते. उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘अ’ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेविका अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहआयुक्त दिलीप गावडे आदी उपस्थित होते. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या. 

काळजे म्हणाले, ‘‘स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना टी-शर्ट व बॅचेस देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच, विसर्जनाच्या ठिकाणी महत्त्वाच्या विभागांच्या अधिकाऱ्यांचे नाव व मोबाईल क्रमांकाचे फलक लावले जातील.’’

पवार म्हणाले, ‘‘महापालिकेच्या कार्यक्रमांसाठी रस्त्याला अडथळा होणार नाही, अशा प्रकारे व्यासपीठ उभारले जाईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढील काळात शाडू मातीच्या मूर्ती घेण्याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी. शहर प्लॅस्टिकविरहित करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.’’