घरातल्या उत्सवासाठी तयार मंडप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सातारा - सुंदर नक्षी, कलात्मक आकाराच्या थर्माकोलच्या मखरांबरोबरच खऱ्या अन्‌ प्लॅस्टिक फुलांची, रंगीत पुठ्ठ्यांची विविध प्रकारची मखरे बाजारात दाखल झाली आहेत. गणेशाच्या घरगुती सजावटीसाठी तयार छत, पडदे खरेदीकडेही नागरिकांचा कल वाढला आहे.

सातारा - सुंदर नक्षी, कलात्मक आकाराच्या थर्माकोलच्या मखरांबरोबरच खऱ्या अन्‌ प्लॅस्टिक फुलांची, रंगीत पुठ्ठ्यांची विविध प्रकारची मखरे बाजारात दाखल झाली आहेत. गणेशाच्या घरगुती सजावटीसाठी तयार छत, पडदे खरेदीकडेही नागरिकांचा कल वाढला आहे.

घरगुती गणपतीसाठी चांगले मखर असावे, अशी प्रत्येकाची धारणा असते. अनेक जण घराची दिवळी रंगवून आकर्षक करतात, तर काही नागरिक दिवळीऐवजी टेबलवर सुंदर मखरात मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन बाजारात विविध प्रकारची मखरे विक्रीस आली आहेत. थर्माकोलची ही मखरे सुबक आहेत. त्यामध्ये सोनेरी सिंहासन, त्याच्या बाजूला हंड्यातून पाणी ओतत असलेले हत्ती, तेथेच धबधबा, कमळ, भव्य मंदिर अशा विविध प्रकारातील आणि रंगातील मखरे विक्रीस आहेत. शहरातील विक्रेत्यांनी विविध प्रकारची, विविध रंगांतील आणि आकारातील मखरे बाजारात उपलब्ध केली आहेत. थर्माकोलवर स्प्रेने आकर्षक रंग देण्यात आले आहेत. रंगांबरोबरच चकमकीचाही वापर केला जात आहे. मखरांना विजेचे लहान दिवे जोडण्यात आले आहेत. दिव्यांच्या प्रकाशात चमकणारी ही मखरे सर्वांनाच आकर्षित करत आहेत. मोती चौक, कर्मवीर भाऊराव पाटील पथ, राजपथावरील अनेक दुकानांत ही थर्माकोलची मखरे विक्रीसाठी मांडली आहेत.

गेल्या वर्षीपासून फुलांची मखरेही उपलब्ध आहेत. यावर्षी कलाकारांनी आकारात विविधता आणलेली दिसते. सध्या बाजारात असलेल्या या मखरांनी प्लॅस्टिक फुले गुंफली आहेत. या मखरांचे दर १५० रुपयांपासून पुढे आहेत. मात्र, उत्सवाला प्रारंभ होण्यापूर्वी एक ते दोन दिवसांहून जास्त काळ टिकणारी जरबेऱ्याची फुले गुंफलेली मखरेही बाजारात मिळतात. 

दरम्यान, घरातल्या उत्सव मूर्तींसाठी मंडप अन्‌ तयार छत मिळू लागले आहेत. विविध कापड दुकाने, स्टेशनरी दुकाने, तसेच फुटपाथवरही विक्रीस उपलब्ध आहेत. पडद्यांसाठी चकमकीत टिकल्या लावलेले कापड नागरिक आवर्जून खरेदी करताना आढळतात. त्याचे दर साधारण ४० ते ५० रुपये मीटरप्रमाणे आहेत.

टॅग्स

गणेश फेस्टिवल

ढोल-ताशांच्या दणदणाटासह ‘बाप्पा’ला निरोप विसर्जन मिरवणुकीची २८ तासांनी सांगता पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश...

गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

गेल्या वर्षीच्या तुलनेत १.७ डेसिबलची घट पुणे - यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’चा थरार, उडती गाणी आणि ढोल-ताशांचा...

गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

पुणे - ऐश्‍वर्याचे प्रतीक असलेल्या आणि लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघालेल्या धूम्रवर्ण रथात विराजमान झालेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई...

गुरुवार, 7 सप्टेंबर 2017