Horoscope - 03/25/2018 - 00:15

Horoscope - 03/25/2018 - 00:15

उत्साह व उमेद वाढेल. मन आशावादी व आनंदी राहील. करमणूक, मनोरंजन, सिनेमा, नाटक याकडे ओढा राहील. प्रवासाचे योग येतील. पाहुणे येण्याची शक्‍यता.

आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. उधार, उसनवारी वसूल होईल. व्यवसायातील तुमचे अंदाज व अडाखे योग्य ठरतील.

आरोग्य उत्तम राहील. भावनिक व व्यक्तिमत्त्व विकास होण्याच्या दृष्टीने ग्रह चांगले आहेत. तुमची पावले योग्य दिशेकडे वळतील. प्रवासाचे योग येतील.

महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. खर्चाची तोंडमिळवणी करू शकाल. कामाचा ताण जाणवेल, दगदग होईल.

वरिष्ठांशी व वडिलधाऱ्यांशी मतभेदाची शक्‍यता. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता संभवते.महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

प्रवासाचे योग येतील. मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रगतीकडे वाटचाल चालू राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

आजचा दिवस अत्यंत आनंदात जाईल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. उधार, उसनवारी वसूल होईल.

आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील. महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या दृष्टीने व आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. विवाहेच्छूंचे विवाह जमतील.

व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. गडी, नोकर-चाकर, कर्मचारी वर्ग यांचे चांगले सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय नकोत. प्रॉपर्टीचे व्यवहार शक्‍यतो टाळावेत.

मन आनंदी व आशावादी राहील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. कला, साहित्य, संगीत, नाट्य क्षेत्रांतील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.

मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायात वाढ होईल. एखादी चांगली बातमी समजेल. बरेच दिवस अडलेली कामे मार्गी लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com