भविष्य

मेष:
प्रियजनांचा सहवास लाभेल. विरोधकावर मात कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अस्वस्थता जाणवेल.
वृषभ:
मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देणे गरजेचे वाटेल. मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.
मिथुन:
अनेक दिवसांपासून रखडलेली प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मानसिक शांतता लाभेल. आर्थिक सुयश लाभेल.
कर्क:
जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. काहींना प्रवासाचे योग येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. काहींना गुरुकृपा लाभेल.
सिंह:
व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. कौटुंबिक जीवनात महत्त्वाचे प्रश्‍न सोडवू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल.
कन्या:
तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. इतरांचे मार्गदर्शन करू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
तूळ:
खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. आश्‍वासनांवर अवलंबून राहू नका. वरिष्ठांकडून सहकार्याची अपेक्षा करू नये.
वृश्चिक:
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. सुयश लाभेल. मानसिक सौख्य लाभेल.
धनु:
उत्साह व उमेद वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील.
मकर:
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवासाचे योग येतील. मन आनंदी राहील.
कुंभ:
प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. वादविवादात सहभाग टाळावा. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे.
मीन:
बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्‍टर्स, डेव्हलपर्स, लॅंड डिलर्स या क्षेत्रातील व्यक्‍तींना आजचा दिवस चांगला आहे. कामे मार्गी लागतील.
रविवार, मे 20, 2018 ते शनिवार, मे 26, 2018
मेष:
स्थळांसाठी ऑनलाइन राहा! भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गतिमान बुध सुपरिणाम घडवणारा. ता. 23 व 24 हे दिवस सर्व प्रकारे भाग्यबीजं पेरणारे. विवाहस्थळांसाठी ऑनलाइन राहाच! बाकी, मंहळ-हर्षल या ग्रहांचं फील्ड सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींची मनःस्थिती चिडचिडी करेल. गैरसमज होतील.
वृषभ:
नोकरीत बढतीचा योग कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह अतिशय सुंदर. व्यावसायिक प्राप्तीचा विक्रम कराल. घरातल्या होतकरू तरुणांना नोकरी लागेल. बुधवार मोठ्या मौज-मजेचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता गुरुवारी दूर होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढती. उत्तम प्रकारची खरेदी कराल.
मिथुन:
नोकरीत वरिष्ठांची कृपा शुक्रभ्रमणाचा मृदु-मुलायम स्पर्श सप्ताहात अपेक्षित आहे. प्रेमळ माणसांचा सहवास लाभेल. ता. 24 व 25 हे दिवस तुमच्या राशीसाठी एकूणच भन्नाट. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ग्लॅमर मिळेल. तरुण-तरुणींची मनःस्थिती कमालीची आनंदी राहील. अर्थातच "गीत गाता चल' असा अनुभव येईल. परिचयोत्तर विवाहयोग. नोकरीत वरिष्ठांची कृपा राहील.
कर्क:
महिलांशी सौजन्यानं वागा ग्रहांचं फील्ड परस्परविरोधी राहील. "कुछ खोया, कुछ पाया' असा अनुभव येईल. ता. 23 व 24 हे दिवस पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अत्यंत वेगाचे. मोठ्या आर्थिक उलाढाली होतील. मात्र, या सप्ताहात स्त्रीदाक्षिण्य दाखवाच. स्त्रीवर्गाशी सौजन्यानं वागा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणात यश. विशिष्ट नुकसानभरपाई मिळेल.
सिंह:
नोकरीची मुलाखत यशस्वी सप्ताहातला बुध-गुरूचा योग भन्नाट फळं देईल. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात काही फायनल्स जिंकतील. ता. 24 व 25 हे दिवस तुम्हाला सुखस्वास्थ्याचं पॅकेज देणारे. मघा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजचा रविवार रस्त्यावर धडकाधडकीचा. सॉरी म्हणा!
कन्या:
सुगंधित क्षण अनुभवाल या सप्ताहात व्यावसायिक लाभाची परंपरा राहील. मंत्रालयातली कामं होतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार "छप्पर फाड के' देणारा. सौंदर्यवतीच्या प्रेमात पडाल. सुगंधित क्षण अनुभवाल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी चीजवस्तू, कागदपत्रं, क्रेडिट कार्ड सांभाळावं...चोरीचं भय.
तूळ:
नवपरिणितांनी वाद टाळावेत या सप्ताहात तरुणांचं नैराश्‍य दूर होईल. काहींना छंद-उपक्रमांद्वारे मोठं यश मिळेल. ता. 23 व 24 हे दिवस शुभग्रहांच्या पॅकेजचे. विशिष्ट संशोधनात यश मिळेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती अधिकार गाजवतील! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अहंकारी स्त्रीकडून त्रास होण्याची शक्‍यता. नवपरिणितांचे मोठे वाद होऊ शकतात. शनिवारी काळजी घ्या.
वृश्चिक:
आर्थिक कोंडी फुटेल या सप्ताहात स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. ता. 24 व 25 या काळात आर्थिक कोंडी फुटेल. काहींची कर्जमंजुरी होईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्सव-समारंभातून मान-सन्मान मिळण्याचा योग. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी काळजीपूर्वक वागावं. विचित्र ताण येण्याची शक्‍यता. घरातली लहान मुलं सतावतील.
धनु:
साडेसातीच्या झळा कमी होतील हा सप्ताह साडेसातीच्या झळा कमी करणारा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचे शुभ ग्रह लाड करतील! ता. 23 ते 25 मे हे दिवस प्रचंड प्रवाही. मोठी कामं मार्गी लागतील. तरुणांना नोकरीसाठीच्या मुलाखतींना यश येईल. काहींना नोकरीसाठी परदेशी जाण्याचाही योग. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवार संध्याकाळी सावध राहावं. विचित्र प्रकारच्या चोरीची शक्‍यता.
मकर:
तरुणांनो, अतिरेक टाळा आजचा रविवार आणि ता. 26 मेचा शनिवार हे तरुणवर्गासाठी "बॅड डेज्‌' राहतील. तरुणांनो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. जुगार टाळा. बाकी, श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारी सुवार्तांचा शिडकावा सुखावून जाईल. मोहरून जाल! धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. शनिवार स्त्रीच्या कटकटीचा. काळजी घ्या.
कुंभ:
आम खान से मतलब रखो! या सप्ताहात गुरुभ्रमणातला एक टप्पा सुरू होत आहे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना काही लाभ अपेक्षित आहेत. अर्थात तुम्ही "सिर्फ आम खाने से मतलब' ठेवा! बुधवार अतिशय शुभदायी. घरातल्या प्रिय व्यक्तींच्या उत्कर्षानं सद्गदित व्हाल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग. अपत्यलाभ.
मीन:
वास्तूविषयक व्यवहार होतील राश्‍याधिपती गुरूची खेळी राहील. ता 24 व 25 मे हे दिवस अतिशय शुभदायी. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांत मोठं यश मिळेल. वास्तुविषयक व्यवहार होतील. घरातल्या विवाहेच्छूंचे विवाह ठरतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी चीजवस्तू जपाव्यात. चोरीचं भय. घरातल्या लहान मुलांचे उपद्‌व्याप सांभाळा!

ताज्या बातम्या