भविष्य

मेष:
दानधर्म कराल. प्रवास टाळावेत. विरोधक व हितशत्रूंवर मात करू शकाल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ:
महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. काहींचा मात्र मानसिक व बौद्धिक गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.
मिथुन:
प्रवासामध्ये काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता राहील. जागेसंदर्भात वा प्रॉपर्टीच्या संदर्भात काही अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
कर्क:
आत्मविश्‍वासाच्या जोरावर येणाऱ्या अडचणींवर मात कराल. कार्यक्षेत्रामध्ये जिद्दीने कार्यरत रहाल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.
सिंह:
कौटुंबिक जीवनात मतभेद संभवतात. आर्थिक व्यवहार जपून करावेत. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील.
कन्या:
वाहने चालवताना दक्षता हवी. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामातही मनस्ताप संभवतो.
तूळ:
फार मोठे आर्थिक धाडस आज नको. काहींचा नको त्या गोष्टीवर वेळ व पैसा वाया जाईल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक:
प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत. सहकाऱ्यांशी व मित्रमैत्रिणींशी मतभेदाची शक्‍यता आहे. अपेक्षित गाठीभेटी पडतील.
धनु:
मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. तुमचे अंदाज चुकण्याची शक्‍यता आहे.
मकर:
मनोबल चांगले राहील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.
कुंभ:
वाहने चालवताना दक्षता हवी. काहींना आरोग्याच्या तक्रारी संभवतील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.
मीन:
प्रवासात काळजी घ्यावी. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. आरोग्यासंदर्भात काळजी घ्यावी.
रविवार, ऑगस्ट 12, 2018 ते शनिवार, ऑगस्ट 18, 2018
मेष:
कुणाशीही स्पर्धा करू नका सप्ताहात गुरुभ्रमण अतिशय संरक्षक राहील. सत्प्रवृत्त माणसांच्या सहवासात राहा. नका करू कुणाशीही स्पर्धा. ता. 17 व 18 हे दिवस जीवनात चमत्कार घडवतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना खूप खूप जगावंसं वाटेल! अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींची कोंडी फुटेल.
वृषभ:
"प्यार हुआ'चा अनुभव येईल शुक्रभ्रमण विशिष्ट व्यावसायिक खेळी यशस्वी करेल. ता. 14 व 15 हे दिवस "गीत गाता चल'चा अनुभव देणारे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना श्रावणसरींमध्ये एकाच छत्रीत "प्यार हुआ'चा अनुभव येईल! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या इतरांशी गाठी-भेटी, मुलाखती यशस्वी होतील. ता. 18 चा दिवस सहलीचा.
मिथुन:
मनासारखी कामं होतील सप्ताहाची सुरवात भन्नाट राहील. तरुणांमध्ये जान येईल! मनासारखी कामं होतील. आवडत्या व्यक्तींचा सहवास सतत मिळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातले सप्तरंग अनुभवतील. ता. 14 व 15 हे दिवस जीवनातल्या डावात हुकमी पानांचे! पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी सखीचा सहवास लाभेल.
कर्क:
कट्ट्यावरच्या गप्पा टाळा राशीच्या वक्री बुधाची किरकिर, पिरपिर राहीलच. नका देऊ फालतू गोष्टींकडं लक्ष. जीवन में और भी कुछ करना है। आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी कट्ट्यावरच्या गप्पा टाळाव्यात. एकांताची सवय लावून घ्या! पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 14 व 15 हे दिवस अत्यंत प्रवाही राहतील. विवाहविषयक गाठी-भेटी करा.
सिंह:
व्यावसायिक मरगळ जाईल श्रावणात देवतांच्या सुगंधित लहरींचा अनुभव घ्याल. ता. 14 व 15 हे दिवस अतिशय प्रसन्न राहतील. विशिष्ट सुवार्ता मिळेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक मरगळ जाईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 17 व 18 हे दिवस शुभ ग्रहांच्या खेळीचेच.
कन्या:
प्रेमगीत गुणगुणण्याचा काळ! राशीचं शुक्रभ्रमण हृदयाच्या तारा छेडणारं. एखादं प्रेमगीत सतत आठवत राहील! तरुणांना ता. 14 व 15 हे दिवस सर्व प्रकारच्या कनेक्‍टिव्हिटी साधून देणारं. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह शुभ ग्रहांच्या मंत्रालयातून साथ देणारा! भूखंड सोडवाल. घरात विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. शनिवार हृद्य समारंभाचा.
तूळ:
कर्जप्रकरणी काळजी घ्या हा सप्ताह गुरुभ्रमणामुळे सद्‌भक्तांना अतिशय लाभदायक. ता. 17 व 18 हे दिवस विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी भाग्यबीजं पेरणारे. नोकरीतलं ग्रहण जाईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता 16 चा दिवस संध्याकाळी विचित्र गाठी-भेटींचा. काहींना कर्जप्रकरणातून त्रास. काळजी घ्या. नवपरिणितांना त्रास.
वृश्चिक:
नोकरीत आसन स्थिर होईल सप्ताहात चंद्र शुभ ग्रहांच्या सान्निध्यातून बलसंपन्न होईल. ता. 14 व 15 हे दिवस वैयक्तिक उत्सव-समारंभातून भारलेले राहतील. पुत्रोत्कर्षाची वार्ता मिळेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना जीवनातले विशिष्ट सीक्वेन्स लागतील. नोकरीतलं आसन स्थिर होईल.
धनु:
आध्यात्मिक गुरू भेटेल शुभ ग्रहांचं पाठबळ राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 14 व 15 हे दिवस उसळी घेणारे. व्यावसायिक कामांचा ओघ राहील. सप्ताहाच्या शेवटी अपवादात्मक शुभ फळं मिळतील. व्याधींवर औषध लागू पडेल. आध्यात्मिक गुरू भेटेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचा प्रेमभंग.
मकर:
कोमल सूर्यकिरणांचा सप्ताह! सद्भक्तांना साथ देणारा सप्ताह. निसर्ग हा फ्रॉड नाही, हे लक्षात ठेवा! निसर्ग माणसाला त्यातल्या त्यात सुखी ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. हा सप्ताह श्रावणातल्या कोमल सूर्यकिरणांचाच. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 14 व 15 हे दिवस जबरदस्त पाठबळ देणारे. तरुणांना मोठा दिलासा.
कुंभ:
कौटुंबिक सुखस्वास्थ्य लाभेल श्रावण महिन्यात पूर्वसंचितातून उत्तम लाभ घेणार आहात. कौटुंबिक सुखस्वास्थ्याचं एक पर्व सुरू होईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचं व्याधींसंदर्भातलं नैराश्‍य दूर होईल. ता. 17 व 18 हे दिवस सर्वतोपरी शुभ. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा धनलाभ.
मीन:
निर्विवाद विजय मिळेल ता. 14 व 15 या दोन दिवसांत प्रचंड चंद्रबळ राहील. जीवनातला स्वातंत्र्योत्सव साजरा कराल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना निर्विवाद विजय मिळेल. विवाहप्रस्ताव क्‍लिक होतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरीचा लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तीला अनुकूल सप्ताह. गृहदेवता प्रसन्न राहील!

ताज्या बातम्या