भविष्य

मेष:
नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. व्यवसायात नवीन उलाढाल करू शकाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.
वृषभ:
जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. दैनंदिन कामे पार पडतील. प्रवास सुखकर होतील.
मिथुन:
शासकीय कामात यश लाभेल. उधारी वसूल होईल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कर्क:
तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
सिंह:
खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादी चिंता लागून राहील. काहींना नैराश्‍य जाणवेल. महत्त्वाचे निर्णय चुकण्याची शक्‍यता आहे.
कन्या:
मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
तूळ:
गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. शासकीय कामात यश लाभेल.
वृश्चिक:
नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. नव्या उमेदीने कार्यरत राहाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.
धनु:
खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्‍यता आहे.
मकर:
आरोग्य चांगले राहणार आहे. खर्चाचे प्रमाण कमी होईल. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
कुंभ:
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिक कार्याकडे ओढा राहील. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
मीन:
आर्थिक लाभाच्या दृष्टीने समाधानकारक स्थिती राहील. अनेकांशी सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील. आरोग्य उत्तम राहील.
रविवार, जून 25, 2017 ते शनिवार, जुलै 1, 2017
मेष:
संकट टळेल, दैवी प्रचीती येईल बुध-मंगळ सहयोगाचं फील्ड शत्रुत्वाच्या झळा पोचवणारं. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर सप्ताहातलं ग्रहमान डंख मारणारं. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ ची अंगारकी संध्याकाळी भाग्यसूचक. दैवी प्रचीती येईल. एखादं संकट टळेल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विजयोत्सवाचा.
वृषभ:
वरिष्ठांशी वाद घालू नका सप्ताहाची सुरवात रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना घरातल्या विचित्र कलहातून त्रास देणारी. काहींना भावा-बहिणीची चिंता. ता. २८ व २९ हे दिवस कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतलं स्वास्थ्य बिघडवणारे. नका जाऊ वरिष्ठांजवळ! शनिवार मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभ.
मिथुन:
कुसंगती नको, प्रलोभनं टाळा हा सप्ताह पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचा. कागदोपत्रीचे व्यवहार जपा. जुगार, प्रलोभन आणि आणि कुसंगती टाळा. सप्ताहाचा शेवट विशिष्ट विजयश्रीकडं नेणारा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवार रस्त्यावर धोकादायक ठरण्याची शक्‍यता. सिग्नलजवळ जपा. स्त्रीशी हुज्जत टाळा.
कर्क:
उद्धटांची संगत टाळलेलीच बरी! हा सप्ताह ग्रहयोगांतून शॉर्टसर्किटचा. सतत उद्धट माणसं भेटतील. त्यांची संगत टाळा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ व २९ हे दिवस अनपेक्षित बदलांचे. पंचमहाभूतांपासून सावध राहा! घरातल्या व्रात्य मुलांना जपा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० जून आणि एक जुलै हे दिवस सुवार्तांचे.
सिंह:
सुना-नातवंडांशी जमवून घ्या अपवादात्मक स्वरूपाचं ग्रहमान. वृद्धांना प्रतिकूल. आत्मप्रौढी मिरवू नका किंवा गाजवू नका. घरातल्या सुना-नातवंडांशी जमवून घ्या. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ३० व एक जुलै हे दिवस व्यावसायिक भाग्योदयाचे. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत सन्मान मिळेल.
कन्या:
पावसा-पाण्यात फिरू नका! सप्ताह व्याधिग्रस्तांना लक्षणं दाखवू शकतो. ता. २८ व २९ हे सप्ताहातले बॅड डेज्‌! पावसा-पाण्यात फिरू नका. यंत्र, विद्युत आणि वाफ आदींपासून सावध राहा. सप्ताहाचा शेवट तुमच्या राशीला आनंदपर्यवसायीच! नवपरिणितांच्या भाग्योदयाचा काळ. वास्तुयोग.
तूळ:
परिस्थितीचं भान ठेवून वागा हा सप्ताह लय बिघडवणारा ठरू शकतो. अपवादात्मक परिस्थितीचं भान ठेवून वागा. नादुरुस्त वाहन हाकू नका. थोडक्‍यात, पंक्‍चर करणारं ग्रहमान! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २८ व २९ हे निश्‍चितच बॅड डेज्‌! शनिवार सन्मानाचा. नोकरीत लाभ.
वृश्चिक:
तूर्तास तुम्ही फक्त पास व्हा! सध्या तुम्हाला ग्रहांची प्रत्येक युनिट टेस्ट जड जात आहे...हरकत नाही! यातून नुसतं पास होऊन पुढं चला. नका करू स्पर्धा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ‘झाले मोकळे आकाश’चा अनुभव येणार आहे. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० जून आणि एक जुलै हे दिवस भाग्यसुमनांच्या कळ्या देऊन जाणारे!
धनु:
द्रुतगती मार्गावर जपून! बुध-मंगळ सहयोगातून हा सप्ताह ठिणग्या उडवणारा. सध्या जीवनाचा एक फास्ट ट्रॅक झाला आहे. या फास्ट ट्रॅकवर वेगाची बंधनं पाळावीच लागतात. या सप्ताहात द्रुतगती मार्गावर जपलंच पाहिजे. सप्ताहाची सुरवात पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मानसिक-शारीरिक-आर्थिक संदर्भातून अपघातप्रवण.
मकर:
चहाडी-चुगली करू नका या सप्ताहात तुम्ही भांडणाचं निमित्त होऊ नका. चहाडी, चुगली किंवा कुचाळ्यांपासून दूरच राहा. ता. २८ व २९ हे दिवस टाईमबॉम्बसारखे! नवपरिणितांनी जपलं पाहिजे. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या आनंदाचा. प्रेमिकांसाठी ‘गूँज उठी शहनाई’चा काळ.
कुंभ:
कशाला पडताय राजकारणात ? ‘दक्षिण कोरिया’ आणि ‘उत्तर कोरिया’ अशी ग्रहांची विभागणी होत आहे. सावध! नाकासमोर चाला. राजकारणात अजिबात पडू नका. नका देऊ कुणाला आव्हान. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहाचा शेवट अगदी मनासारखा जाईल!
मीन:
हाय व्होल्टेजचा सप्ताह...जपून राहा! बुध-मंगळ सहयोगाचं सप्ताहात हाय व्होल्टेज राहील. हात पोळून निघणार नाही, याची काळजी घ्या! कायदेशीर भानगडींपासून दूरच राहा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २८ व २९ हे टोटली बॅड डेज्‌! रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठा रंजक आणि स्वरमधुर!

ताज्या बातम्या