भविष्य

मेष:
रखडलेली कामे मार्गी लागतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. दुपारनंतर प्रियजनांचा सहवास लाभेल.
वृषभ:
तुमच्या क्षेत्रात तुम्हाला सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. विरोधकावर मात कराल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना दिवस विशेष चांगला जाईल.
मिथुन:
आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. दुपारपूर्वी काहींना नैराश्‍य जाणवेल. महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत.
कर्क:
गडी, नोकरचाकर यांचे सौख्य लाभेल. शासकीय कामात यश लाभेल. दुपारनंतर दैनंदिन कामे रखडतील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
सिंह:
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल. सुयश लाभेल.
कन्या:
नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल.
तूळ:
मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. अनेकांच्या गाठीभेटी पडतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना गुरूकृपा लाभेल.
वृश्चिक:
मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. प्रवासाचे योग येतील. प्रवासात काळजी घ्यावी.
धनु:
कौटुंबिक जीवनात सुखाचे व समाधानाचे वातावरण राहील. आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. भागीदारी व्यवसायातील व्यक्‍तींना दिवस विशेष चांगला जाईल.
मकर:
आरोग्य चांगले राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. काहींना एखादी गुप्त वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.
कुंभ:
आरोग्य चांगले राहील. महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. संततिसौख्य लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मीन:
प्रियजनांचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.
रविवार, जानेवारी 14, 2018 ते शनिवार, जानेवारी 20, 2018
मेष:
नवी नोकरी स्वीकाराल अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह मोठ्या घडामोडींचा. नवी नोकरी स्वीकाराल. कलाकारांना मकरसंक्रान्तीची मोठी भेट मिळेल. परदेशी जाण्याच्या संधी मिळतील. अमावास्येचं प्रभावक्षेत्र सार्वजनिक गोष्टींसंदर्भात प्रतिकूल. शेजाऱ्यांशी जपून. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना भ्रातृविरोध.
वृषभ:
व्यवसायात मोठी प्राप्ती हा सप्ताह शुक्राच्या विशिष्ट स्थितीतून खास बोलेल! अमावास्येजवळ व्यावसायिक मोठी प्राप्ती. अवचित गाठी-भेटींतून लाभ. पुत्रचिंता जाईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचा मान-सन्मान. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या अन्न-पाण्यातल्या संसर्गाची. रोख पैसे जपा.
मिथुन:
चीजवस्तूंवर लक्ष ठेवा विचित्र खर्चाचा सप्ताह. काहींना मित्रसंगती भोवेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह सरकारी जाचाचा. बाकी पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना मकरसंक्रान्त वैयक्तिक सुवार्तांची. पतीचा वा पत्नीचा आर्थिक उत्कर्ष. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावास्येच्या आसपास चीजवस्तू सांभाळाव्यात.
कर्क:
नोकरीत भाग्योदयाचा काळ मंगळाचं राश्‍यांतर आणि शुक्रभ्रमणाची स्थिती तरुणांना मोठ्या संधी देणारी. अमावास्या प्रसिद्धियोगाची. नोकरीत भाग्योदय. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग. आई-वडिलांचा भाग्योदय. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या घबाडयोगाची. गुंतवणुकीतून लाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावास्येच्या आसपास चीजवस्तू सांभाळाव्यात.
सिंह:
तरुणांचे प्रश्‍न संयमानं सोडवा हा सप्ताह अमावास्येच्या पार्श्‍वभूमीवर संमिश्र स्वरूपाचा. अमावास्या घरात वादंगाची. घरातल्या तरुणवर्गाचे प्रश्‍न सतावतील. ते संयमानं सोडवा. कुणाचा विवाह वादग्रस्त बनण्याची शक्‍यता. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना मानसिक पातळीवरून सप्ताह प्रतिकूलच. काळजी घ्या. बाकी, आजची मकर संक्रान्त उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या चैनीची.
कन्या:
नवं मित्रमंडळ मिळेल मकर संक्रान्त मोठी लाभदायी ठरणार आहे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय सुरक्षित वाटू लागेल. नवं मित्रमंडळ जोडलं जाईल. नवपरिणितांना हा सप्ताह गोड बातम्या देणारा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती कात टाकतील. एखादं शैक्षणिक यश चित्र बदलून टाकेल. मुलाखती द्याच.
तूळ:
सरकारी नोकरी मिळेल राशीच्या गुरूचं स्थान मकर संक्रान्तीनंतर आणखी बळकट होईल. यंदाची मकर संक्रान्त वैशिष्ट्यपूर्ण मानावी लागेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा राज्याभिषेक होईल! पतप्रतिष्ठेचं पर्व सुरू होईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना मकर संक्रान्तीचा सप्ताह भावसमृद्ध करणारा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी नोकरी मिळेल.
वृश्चिक:
नोकरीतलं बालंट दूर होईल अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मकर संक्रान्त अत्यंत शुभदायक. वैवाहिक जीवनात सुवार्ता. नोकरीतलं बालंट दूर होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासचा काळ संमिश्र स्वरूपाचा. प्रवासात बॅगांची काळजी घ्या. सावधपणे खरेदी करा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थाटनाचा योग.
धनु:
संक्रान्तीला दीपाराधना करा साडेसातीतलं हे मकर-संक्रमण वैशिष्ट्यपूर्ण असंच! दीपाराधना करा. हव्यास टाळा. बाकी, ही अमावास्या मकर-संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर नोकरीत कष्टप्रद. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीचिंता. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अनपेक्षित प्रवास. शेवटी मोठा धनलाभ.
मकर:
स्वतंत्र व्यावसायिकांना लाभ मकर-संक्रमण आणि अमावास्या असा दुहेरी परिणाम या सप्ताहावर राहील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह संमिश्र स्वरूपाचाच. स्वतंत्र व्यावसायिकांना लाभ होतील. मात्र, काहींना भागीदारीचे प्रश्‍न सतावतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची अमावास्येनंतर मोठी घोडदौड. आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील.
कुंभ:
सरकारी कामांना वेग येईल सध्या ग्रहमंडलातल्या गुरू-शनीसारख्या वरिष्ठांची तुमच्यावर कृपा आहे. ता. १६ च्या अमावास्येनंतर प्रवास, गाठी-भेटी, विशिष्ट करारमदार आणि सरकारी कामं या बाबींना मोठा वेग येईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टाच्या कामात यश मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग. व्हिसा मिळेल.
मीन:
व्यावसायिक उपक्रमांना दिशा यंदाचं मकर-संक्रमण तुम्हाला विशेष शुभ राहील. नव्या व्यावसायिक उपक्रमांना दिशा मिळेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या घरातल्या वृद्धांच्या संदर्भातून चिंतेची. बाकी, ता. १८ व १९ हे दिवस तुमच्या राशीला नववर्षाची भेट देतील. कलाकारांचा भाग्योदय.

ताज्या बातम्या