भविष्य

मेष:
मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना एखादा मनस्ताप संभवतो.
वृषभ:
वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन:
मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्च वाढणार आहेत.
कर्क:
अनेकांशी सुसंवाद साधाल. नवे स्नेहसंबंध जुळतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
सिंह:
मानसन्मान, प्रतिष्ठेचे योग येतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
कन्या:
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे.
तूळ:
व्यवसायातील उलाढाल वाढेल. महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लावाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृश्चिक:
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. जिद्दीने कार्यरत रहाल.
धनु:
शासकीय कामात अडचणी जाणवतील. अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकला.
मकर:
मित्रमैत्रिणींचे विशेष सहकार्य लाभेल. संततीसौख्य लाभेल. आर्थिक लाभ संभवतो.
कुंभ:
मानसन्मानाचे, प्रतिष्ठेचे योग येतील. आरोग्य उत्तम राहील. दैनंदीन कामे मार्गी लागतील.
मीन:
प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. कार्यक्षेत्र वाढणार आहे.
रविवार, जुलै 22, 2018 ते शनिवार, जुलै 28, 2018
मेष:
अवघड कामं सफल होतील हा सप्ताह अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहयोगांतून बाधक. रवी-हर्षल योग आणि चंद्रग्रहणाची पार्श्‍वभूमी विचित्र प्रसंगांमुळं अडचणीत आणू शकते. अतिरेकानं वागणाऱ्या माणसांशी ता. 27 व 28 रोजी गाठ पडेल. बाकी, गुरुवार भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना दैवाची साथ देणारा. अवघड कामं सफल होतील.
वृषभ:
विजयोत्सव साजरा कराल या सप्ताहात रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ ग्रहांकडून गुप्त रसद पुरवली जाईल! ता. 22 व 23 हे दिवस विजयोत्सवाचे. पती वा पत्नीचा भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात सहली-करमणुकीचे योग. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रग्रहणाच्या आसपास मातृ-पितृचिंता शक्‍य.
मिथुन:
विकारांवर नियंत्रण ठेवा ग्रहयोगांतून विचित्र ट्रॅप लावले जातील. काम-क्रोध आवरा. धावपळीचा प्रवास टाळा. भाजण्या- कापण्याबाबत सावधगिरी बाळगा. मृग नक्षत्राच्या व्यक्ती कुयोगांच्या ट्रॅपमध्ये अडकू शकतात. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात वादाचा केंद्रबिंदू होण्याची शक्‍यता. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार शुभ.
कर्क:
वादग्रस्त वागणं टाळा रवी-हर्षल योग आणि वक्री मंगळाच्या अकांडतांडवातून जाणारा सप्ताह. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींच्या संदर्भात वादग्रस्त मुद्दे उद्भवतील. अन्यायातून पेटून उठाल! चंद्रग्रहणाच्या आसपासच्या काळात तुमची रास लक्ष्य होऊ शकते. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार आनंदाचा. धनलाभ. कर्जमंजुरी.
सिंह:
प्रिय व्यक्तींचा सहवास पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसंदर्भात सप्ताहाच्या सुरवातीला शुभघटना घडतील. महत्त्वाच्या गाठी-भेटी होतील. नोकरीच्या मुलाखतींना यश. प्रिय व्यक्तींचा गोड सहवास लाभेल! बाकी, ता. 27 व 28 हा चंद्रग्रहणाचा काळ मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अस्वस्थतेचा. दुर्घटनांची शक्‍यता. चोरी-नुकसानीच्या घटना. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्री-चिंता.
कन्या:
भावंडांशी मतभेद शक्‍य हा सप्ताह तुम्हाला जनसंपर्कातून विचित्र तऱ्हेचे अनुभव देणारा. एखाद्या स्त्रीशी गैरसमज होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात भाजण्या-कापण्याचे प्रसंग. भावंडांशी मतभेदांची शक्‍यता. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार भाग्यदायक. ग्रहणाच्या आसपाच्या काळात दगदग होईल. विद्युत्‌-उपकरणं जपा.
तूळ:
सत्त्वपरीक्षेचा काळ, संयम बाळगा हा सप्ताह अपवादात्मक अशा ग्रहमानाचा. नोकरीतल्या घटना अस्वस्थ करतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती चंद्रग्रहणाच्या आसपासच्या काळात लक्ष्य केल्या जाऊ शकतात. हितशत्रुपीडा सतावेल. नवपरिणितांना हा सप्ताह सत्त्वपरीक्षेचा. संयम ठेवा. बाकी, स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार संकटकालीन मार्ग दाखवणारा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल.
वृश्चिक:
कुटुंबातला तणाव वाढवू नका साडेसातीतलं चंद्रग्रहण नैराश्‍य आणू शकतं. कौटुंबिक ताण-तणाव अस्वस्थ करतील. धीरानं घ्या. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना बदलीतून त्रास. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रग्रहणाच्या आसपासच्या काळात व्यावसायिक कामगारपीडा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात शुभग्रहांची उत्तम साथ. पुत्रोत्कर्ष.
धनु:
परदेशात नोकरीची संधी चंद्रग्रहणाच्या आसपासच्या काळात वक्री ग्रह जीवनावश्‍यक रसद तोडतील. नियोजन कराच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट वेदनाशामक व्याधींतून त्रास होऊ शकतो. काहींना स्नायुपीडा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारी गुरुबळातून लाभ. मोठ्या सुवार्ता. नोकरीसाठी परदेशी बोलावणं येईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अपत्यलाभ. तरुणांचा भाग्योदय.
मकर:
जीवनाचं कोडं उलगडेल! सप्ताहातले रवी-मंगळ-हर्षल या ग्रहांचे योग आगीत तेल ओतणारे. क्रिया-प्रतिक्रियांतून सावध राहाच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती चंद्रग्रहणाच्या ब्लॅक ऑउटखाली येतील. तिन्हीसांजसमयी नैराश्‍य येईल. रामरक्षा म्हणा! श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार दैवी प्रसन्नतेचा. जीवनाचं कोडं उलगडेल!
कुंभ:
नोकरीत भाग्योदयाचा काळ रवी-हर्षल योगाच्या पार्श्‍वभूमीवर चंद्रग्रहण तुमची ऍसिडिटी वाढवणारं! असभ्य माणसं भेटतील. नोकरीत संशयाचं वातावरण निर्माण होईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती चंद्रग्रहणाच्या आसपासच्या काळात कुयोगांनी प्रभावित होऊ शकतील. बाकी, पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना एकादशी नोकरीत भाग्योदयाची. व्हिसा मिळेल.
मीन:
अद्भुत घटनांचा सप्ताह हा सप्ताह नैसर्गिक साथ न देणाराच. घरातल्या परिस्थितीत अडकून पडाल. गृहिणीवर्गाला हा सप्ताह मोठ्या दगदगीचा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रिय व्यक्तींचे रुसवे-फुगवे सतावतील. घरात अनपेक्षित पाहुणे येतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार अद्भुत घटनांचा. हरवलेलं गवसेल!

ताज्या बातम्या