जळगाव : अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास शासनाची मंजुरी

वाढीव वस्त्यांच्या १७८ किलोमीटर भागातही राबविणार प्रकल्प
Jalgaon amrut mission second stage Government approval
Jalgaon amrut mission second stage Government approval sakal

जळगाव : पाणी पुरवठ्याच्या अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील वाढीव वस्त्याचा १७८ किलोमीटरचा भाग राहिला होता. आता शासनाने त्यालाही मंजुरी दिली असून त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. प्रत्येक घराला शुद्ध पाणीपुरवठा या शासनाच्या धोरणानुसार शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी ‘अमृत’योजनेला मंजुरी मिळाली. पहिल्या टप्प्यातील ५६५ किलोमीटरच्या कामाला महापालिकेच्या माध्यमातून प्रारंभही झाला. आता योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च २०२१ पर्यंत या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार असून त्यांची चाचणीही करण्यात येणार आहे.

Jalgaon amrut mission second stage Government approval
उत्तराखंडमध्ये भाजपला डबल दणका; मंत्र्यासह आमदाराचा राजीनामा?

दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव

पहिला टप्प्यात ५६५ किलोमीटरला मंजुरी मिळाली, परंतु शहराचा आता विस्तार झाला असून नवीन काही कॉलन्या तयार झाल्या आहेत, तर काही जुना भागही आहे. अशा एकूण १७८ किलोमीटरच्या भागात ही योजना मंजूर झाली नव्हती, त्यामुळे हा भाग ‘अमृत’योजनेत येत नव्हता, मात्र महापालिका प्रशासनाने या नवीन व काही राहिलेल्या जुन्या भागात ही योजना राबविण्यासाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता.

Jalgaon amrut mission second stage Government approval
राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू; अनिल परबांची घोषणा

राज्य शासनाची मंजुरी

महापालिकेला अमृत योजनेसाठी एकूण २४८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता, त्यात पहिल्या टप्प्यात १९३ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली होती. आता राहिलेल्या निधीतून दुसऱ्या टप्प्याचे काम करण्यात येणार आहे. शासनाने त्याला मंजुरी दिली आहे, याअतंर्गत कोणत्याही नवीन निविदा न काढता त्याच मक्तेदारामार्फत हे काम करण्यात येणार आहे. शासनातर्फे त्याबाबत अधिकृत मंजुरी पत्र आल्यानंतर हे काम सुर करण्यात येणार आहे.

Jalgaon amrut mission second stage Government approval
मुक्काम पोस्ट थत्तेकड

पहिला टप्पा मार्चला पूर्ण

अमृत योजनेच्या पहिल्या १७८ किलोमीटरचे काम अंतिम टप्प्यात आहे, मार्च २०२१ अखेर ते काम पूर्ण होणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. या योजनेंतर्गंत पाणी पुरवठ्याची चाचणीही करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.

‘वॉटर मीटर’ सद्यःस्थितीत नाही

राज्यशासनाची अमृत योजना सुर झाल्यानंतर घरगुती नळाना ‘वॉटर मीटर ’बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र याबाबत अधिक माहिती अशी कि, अमृत योजनेच्या अंतर्गत वॉटर मीटर बसविण्याची कोणतीही योजना नाही,मात्र राज्यशासनाकडे त्या बाबत प्रस्ताव आहे, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही,तो निर्णय झाल्यानंतर ते बसविण्याबाबत निर्णय होईल, त्यामुळे सद्या तरी अमृत योजना सुरू झाल्यावर ‘वॉटर मिटर’बसविण्यात येणार नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com