जळगाव : 28 जूनला डाक पेन्शन अदालत

Indian Postal Department
Indian Postal Departmentesakal

जळगाव : डाक विभागाच्या (Postal department) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयी तक्रारी समजून घेण्यासाठी जळगाव डाक विभागातर्फे डाक अधीक्षक यांच्या कार्यालयात २८ जूनला पेन्शन अदालत (Pension Court) होणार आहे. दुपारी चारला हा कार्यक्रम होईल. (Postal Pension Court on 28th June Jalgaon News)

Indian Postal Department
Ashadhi Wari : पाहुयात रिंगण सोहळ्याची क्षणचित्रे!

जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या पेन्शन अदालतीत दखल घेतली जाईल. यामध्ये टपाल विभागातून निवृत्त झालेल्या अथवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा विचार करण्यात येईल. पेन्शन अदालतमध्ये वैयक्तिक कायदेशीर प्रकरणे जसे वारस, नाती आधारित सूचना, तक्रारी यांचा विचार केला जाणार नाही यांची सर्वांनी नोंद घ्यावी, अधिक माहितीसाठी अधिक्षक डाकघर (मुख्यालय), जळगाव यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Indian Postal Department
Nashik : पेन्शन अदालतमध्ये 55 प्रकरणे निकाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com