Jalgaon | जप्त वाळूच्या ट्रॅक्टरांनी घेतला पेट

seized sand tractors cought fire by scorching heat Jalgaon news
seized sand tractors cought fire by scorching heat Jalgaon news esakal

जळगाव : तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेकायदा वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर (Tractor) जप्त करून लावण्यात आले आहे. या संदर्भात विविध गुन्हे दाखल असून अद्याप या वाहनांची कायदेशीर सुटका झालेली नसताना शनिवारी (ता. २३) अचानक उभ्या ट्रॅक्टरने पेट घेतल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या पथकाने तत्काळ आग आटोक्यात आणली.

seized sand tractors cought fire by scorching heat Jalgaon news
Nashik | सिटीलिंकतर्फे आणखी तीन मार्गांसाठी बससेवा

जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आणि महामार्गावर विविध कारवाईअंतर्गत महसूल आणि पोलिस पथकांनी जप्त केलेल्या ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा दाखल होऊन वाहन जप्त करण्यात आले आहे. प्रकरणांचा निपटारा होत नसल्याने या ठिकाणी वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. वाहने उभे करण्यास जागा नसल्याने कारवाई झालेल्या या ट्रॅक्टरांसाठी पोलिस ठाण्याच्या शेजारील जागेवर वाहने उभी राहत आहेत. शनिवारी तापमानामुळे गवतांना आग लागून यात संबंधित वाहनांनीही पेट घेतला. तालुका पोलिसांनी महापालिका अग्निशामक दलास पाचारण केले. देवीदास सुरवाडे, फायरमन रोहिदास चौधरी, भगवान पाटील, दिलीप पवार यांच्या पथकाने धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

seized sand tractors cought fire by scorching heat Jalgaon news
पाकिस्‍तानातील शिक्षणास मनाई; SICTE, UGC ची विद्यार्थ्यांसाठी सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com