...अखेर माकुणसार येथील शाळा उघडली

...अखेर माकुणसार येथील शाळा उघडली

पालघर (ठाणे): गेले दोन दिवस बंद करण्यात आलेल्या माकुणसार येथील पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेत पंचायत समितीने तात्पुरता शिक्षक दिल्याने गुरुवारी (ता. 23) शाळा उघडण्यात आली. गत तीन वर्षापासून शाळेला योग्य शिक्षक न दिल्याने माकुणसार येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. 21) सकाळी आंदोलन करून टाळे लावले होते. गेल्या तीन वर्षांत शाळेला तिसरयांदा टाळे लावले गेले. या वेळी मात्र हा प्रश्न जास्त चिघळून ग्रामस्थांनी शाळा शिक्षक मिळे पर्यंत बंद ठेवली होती. अखेर पंचायत समितीने माकणे केंद्रातील पंडित पाडयातील शिक्षक चंद्रदेव डहाणे यांना तात्पुरता माकुणसार शाळेवर नेमले.

सफाळे रेल्वे स्थानकाच्या लगतच चार किलोमीटर अंतरावर असलेल्या माकुणसार गावातल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गेल्या वर्षी पहिली ते चौथी वर्गात 52 विद्यार्थी शिक्षण घेत होते. योग्य शिक्षक नसल्याने विद्यार्थी संख्या खालावली असून ती या वर्षी 39 झाली आहे. या शाळेत चेतना गावड या प्रमुख शिक्षिका म्हणून कार्यरत असून दुसरया एक सहशिक्षिका म्हणून काम करीत आहेत. या पैकी सहशिक्षिकांना गेल्या जून महिन्यापासून सहा महिने उलटून गेले तरी शाळेत ग्रामस्थांनी हजरच करून घेतले नाही. त्यांचे अध्यापन चांगले नसल्याने या शिक्षिकेची बदली करावी असे येथील पालकांचे म्हणणे आहे. याशिक्षिकेच्या विरूद्ध पालकांनी अनेक वेळा गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र या तक्रारीची गंभीर दखल संबंधीतांनी घेतली नाही.

यापूर्वी दोन वेळा या प्रश्नासाठी शाळेला टाळे ठोकणयात आले होते. या वेळी पुन्हा ग्राम पंचायतीने 7 नोव्हेंबर 2017 रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या  मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन आम्हाला कायम स्वरूपी शिक्षक मिळावा अन्यथा शाळा बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र, या वेळीही प्रशासनाने दुर्लक्षच केले. तर हा प्रश्न कायमचा सुटेपर्यंत शाळा उघडायची नाही. असा निर्णय ग्रामस्थांनी मंगळवारी घेतला होता. सदर गंभीर बाब पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने लक्षात घेऊन केंद्र प्रमुख भावना गोरूले यांना गुरुवारी शाळेत जाऊन तूर्तास शिक्षक चंद्रदेव डहाणे यांना तात्पुरता माकुणसार शाळेवर हजर करून घ्यायला सांगितले. त्यामुळे दोन दिवसांनंतर शाळा सुरुळीत पुन्हा सुरू करण्यात आली.

या आंदोलन काळात या केंद्राच्या क्रीडा स्पर्धा बुधवारी (ता. 22) आगरवाडी येथे पार पाडल्या. मात्र, पालकांनी या स्पर्धेला विद्यार्थ्यांना न पाठवल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील तालुका पातळीवर होणारया क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com