धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटनंतर आता राशिदच्या स्नेक शॉटची चर्चा

 Rashid Khan Invent snake Shot
Rashid Khan Invent snake Shotesakal

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्सकडून राशिद खानने (Rashid Khan) धडाकेबाद फलंदाजी करण्याचा धडाकाच लावला आहे. त्याने गुजरातला अनेकवेळा पराभवाच्या दाढेतून बाहेर काढत विजयी केले आहे. राशिदने सीएसकेविरूद्ध 40 तर हैदराबादविरूद्ध 31 धावांची खेळी केली होती. गोलंदाजीत मात्र राशिद खानला फारशी चमक दाखवता आलेली नाही. त्याने आठ सामन्यात 7.09 च्या सरासरीने फक्त आठ विकेट घेतल्या आहेत.

 Rashid Khan Invent snake Shot
CSK ची नवीन मिस्ट्री गर्ल; तिच्या अदांवर घायाळ झाले फॅन्स

राशिद खानने फलंदाजीतील केलेल्या कामगिरीबाबत बोलताना सांगितले की, 'एक गोलंदाज म्हणून त्याची प्रमुख भुमिका राहील. मात्र गेल्या 2 ते 3 वर्षापासून मी माझ्या फलंदाजीवर देखील काम करत आहे. मला महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सारखे फिनिशर (Match Finisher) व्हायचयं, मी आपल्या फ्रेंजायजीला एक तगडा पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहे.

राशिद पुढे म्हणाला की, 'गेल्या दोन तीन वर्षापासून मी आपल्या फलंदाजीवर मेहनत घेत आहे. मला विश्वास आहे की माझ्या संघासाठी फिनिशरचा रोल प्ले करू शकतो. माझ्याजवळ ती गुणवत्ता आणि कौशल्य आहे. मला आत्मविश्वास होता की मी मॅच फिनिशर होऊ शकतो. विशेष म्हणजे या संघात (गुजरात टायटन्स) जास्तीजास्त फलंदाजी करण्याची संधी मिळाली.'

 Rashid Khan Invent snake Shot
Badminton Asia Championship : पीव्ही सिंधुची उपांत्यफेरीत धडक

राशिद खानने आपली जुनी फ्रेंचायजी सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध स्फोटक फलंदाजी करत दाखवून दिले की तो मॅच फिनिशरची भुमिका देखील चोख बजावू शकतो. त्याने फक्त 11 चेंडूत 31 धावा चोपून काढल्या. त्यामुळे गुजरातने हैदराबादचे 195 धावांचे आव्हान पार केले. या खेळीदरम्यान राशिद खानने धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट (Helicopter Shot) खेळला होता. या शॉटला राशिद खानने स्नेक शॉट (snake Shot) असे नाव दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com