'सरकारनामा-3'मध्ये अमिताभ बोलणार मराठी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

मुंबई - प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन "सरकारनामा-3'मध्ये मराठी संवाद बोलताना दिसणार आहेत. रामगोपाल वर्मा यांचा हा चित्रपट आहे.

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या "स्वामी तिन्ही जगाचा ः भिकारी' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त बुधवारी जुहू येथे झाला. या वेळी अमिताभ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्‍लॅप देण्यात आला आणि चित्रपटाची घोषणा करण्यात आली. बच्चन म्हणाले की, मराठी चित्रपटसृष्टीची भरभराट होत आहे. मराठीत चांगले चित्रपट येत आहेत. कलाकारही चांगले आहेत. "सरकारनामा- 3' या हिंदी चित्रपटात मीही मराठी संवाद बोलताना दिसणार आहे.

"स्वामी तिन्ही जगाचा - भिकारी' या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश आचार्य करत आहेत. या चित्रपटात स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर हे कलाकार आहेत. या चित्रपटाच्या मुहूर्ताला अमिताभ यांच्यासह टायगर श्रॉफ, "लिबास' या ब्रॅंडचे रियाज आणि रेशमा गांगजी, "ब्राईट'चे योगेश लखानी, सुखविंदर सिंग, रवी किशन आदी उपस्थित होते. गणेश आचार्य यांनी शरद शेलार यांच्यासोबत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट "पिच्छीकरण' या तमीळ चित्रपटाचा रिमेक आहे. एका मोठ्या उद्योगपतीच्या कुटुंबातील आई आणि तिच्या मुलाची ही हळुवार कहाणी आहे.