NCBमध्ये चांडाळचौकडी! नवाब मलिकांनी उघड केली नावं

भाजपला केलं हात जोडून आवाहन
Nawab-Malik
Nawab-Maliksakal media

मुंबई : नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोमध्ये (NCB) एक चांडाळचौकडी असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला असून या चारही जणांची नावंही त्यांनी उघड केली आहेत. आज पुन्हा पत्रकार परिषद घेत त्यांनी हा खुलासा केला आहे. या चार जणांकडून मुंबईत वसुलीची कामं केली जात असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.

Nawab-Malik
Aryan Khan Case - नवाब मलिक यांच्या आरोपांना मोहित कंबोज यांचे उत्तर

समीर वानखेडे म्हणाले, "समीर वानखेडे, व्ही. व्ही. सिंग, आशिष रंजन आणि अनिल माने ही चार लोकं एनसीबीमधील चांडाळचौकडी आहेत. हे लोक एनसीबीला बदनाम करत आहेत, त्यामुळं हे घाणेरडे मासे बाहेर फेकून द्यायला हवेत. यांपैकी कोणालाही चुकीच्या पद्धतीने अडकवू नका पण यांची चौकशी झालीच पाहिजे आणि ती शेवटपर्यंत न्यावी. ड्रग्जची साफसफाई झालीच पाहिजे पण हे लोक जोपर्यंत एनसीबीत आहेत तोपर्यंत हे बंद होणार नाही"

भाजपला केलं आवाहन

मी कुठल्याही पक्षाविरोधात किंवा एनसीबी विरोधात लढत नाहीए. हा केंद्र सरकार विरोधी राज्य सरकार अशी लढाई नाही. 'एमडी'चा ड्रग्जमध्ये समावेश व्हावा यासाठी मी स्वतः प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मी निष्पाप लोकांना फसवून खंडणी गोळा करणाऱ्या चुकीच्या लोकांविरोधात लढतो आहे. त्यामुळं माझं भाजपच्या लोकांना आवाहन आहे की, त्यांनी फसव्या लोकांच्या पाठीशी उभं राहू नये. या प्रकरणातील सुनील पाटील, मोहित कंबोज, मनीष भानुशाली आणि धवल भानुशाली हे लोकही यात सहभागी आहेत त्यामुळं त्यांना वाचवू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com