आलिया माझ्यासाठी प्रेरणादायी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

अमिताभ बच्चन यांच्या "शमिताभ' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री अक्षरा हसन हिने आलिया भटवर स्तुतिसुमने उधळली आहेत. आलियाचे कौतुक करताना ती म्हणते, "एक अभिनेत्री म्हणून आलिया मला केवळ प्रेरणाच देत नाही तर आव्हानही देते.' कमल हसन यांची धाकटी मुलगी अक्षरा लवकरच "लाली की शादी में लड्डू दिवाना'मध्ये झळकणार आहे. अक्षरा म्हणते की, मला आलियाचा पहिला चित्रपट "स्टुडंट ऑफ द इअर' आजही लक्षात आहे. एक कलाकार म्हणून तिने स्वतःमध्ये खूप बदल केला आहे. तिचा मी आदर करते.

अमिताभ बच्चन यांच्या "शमिताभ' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री अक्षरा हसन हिने आलिया भटवर स्तुतिसुमने उधळली आहेत. आलियाचे कौतुक करताना ती म्हणते, "एक अभिनेत्री म्हणून आलिया मला केवळ प्रेरणाच देत नाही तर आव्हानही देते.' कमल हसन यांची धाकटी मुलगी अक्षरा लवकरच "लाली की शादी में लड्डू दिवाना'मध्ये झळकणार आहे. अक्षरा म्हणते की, मला आलियाचा पहिला चित्रपट "स्टुडंट ऑफ द इअर' आजही लक्षात आहे. एक कलाकार म्हणून तिने स्वतःमध्ये खूप बदल केला आहे. तिचा मी आदर करते. रूपेरी पडद्यावर तिचा अभिनय पाहायला खूप मजा येते.' आपली आलियाशी तुलना केल्यावर अक्षरा म्हणाली, "आम्ही शालेय जीवनात एकमेकांशी स्पर्धा करीत होतो. जेव्हा मी आलियाला भेटले तेव्हा ती चांगली अभिनेत्रीच नाही, तर एक उत्तम व्यक्ती असल्याचे जाणवले; मात्र एका कलाकाराच्या रूपात ती माझ्यासाठी फक्त प्रेरणादायी नसून एक आव्हानही आहे.' "लाली की शादी में लड्डू दिवाना'मध्ये अक्षरा मॉडर्न मुलगी लालीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात तिच्यासोबत विवान शाह दिसणार आहे. 7 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

Web Title: aalia bhat my inspiration : akshara hasan