द ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर' यांच्या भूमिकेत अनुपम खेर 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड असून प्रेक्षकांचे राजकीय व्यक्तीरेखांवर येणाऱ्या चित्रपटांकडे जास्त लक्ष लागले आहे. यापैकी एक चित्रपट म्हणजे भारताचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील "द ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर'. या चित्रपटात दिग्गज अभिनेते अनुपम खेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 
या चित्रपटाचे पहिले पोस्टर अनुपम खेर यांनी नुकतेच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.  

भारताच्या इतिहासात विरळ होत चाललेल्या एखाद्या पानाप्रमाणे या चित्रपटाचा फर्स्ट लूक दिसतो. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंग या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट विजय रत्नाकर गुट्टे यांनी दिग्दर्शित केला असून पटकथा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता यांनी लिहीली आहे. 

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या पोस्टरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. या पोस्टरसोबत खेर यांनी एक ओळ लिहिली आहे ती बहुतेक नेटिझन्सच्या पसंतीस उतरल्यचे दिसते. या ओळीत त्यांनी असे लिहिले आहे,""स्वत:च्या अभिनयात नवनवीन प्रयोग करणे हे स्वत:लाच दिलेले एक नवे आव्हान असते. डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका साकारण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे.'