'वाॅंटेड', 'तुम को ना भूल पाएंगे' फेम अभिनेता इंदरकुमार याचे निधन

टीम ई सकाळ
शुक्रवार, 28 जुलै 2017

सलमान खानची मुख्य भूमिका असलेला वाॅंटेड, तुम को ना भूल पाएंगे, घुंगट अशा 20 हून अधिक चित्रपटात अभिनय केलेला अभिनेता इंदरकुमार याचे आज पहाटे 2 च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. तो 45 वर्षांचा होता. सध्या तो फटी पडी है यार च्या चित्रिकरणात व्यग्र होता. 

मुंबई :  सलमान खानची मुख्य भूमिका असलेला वाॅंटेड, तुम को ना भूल पाएंगे, घुंगट अशा 20 हून अधिक चित्रपटात अभिनय केलेला अभिनेता इंदरकुमार याचे आज पहाटे 2 च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. तो 45 वर्षांचा होता. सध्या तो फटी पडी है यार च्या चित्रिकरणात व्यग्र होता. 

इंदरकुमारने अनेक हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या. त्याचे सोलो चित्रपट जरी चालले नसले, तरी अनेक मोठ्या चित्रपटांत त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अंधेरी येथील चार बंगला परिसरातील राहत्या घरी त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात घटस्फोटीत पत्नी व मुलगी आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास यारी रोड स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.