या अभिनेत्रीने चक्क ८४ तास केली मेहनत!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

प्रसिद्ध व्हायला कोणाला आवडत नाही?.. पण प्रसिद्ध होण्याची एक किंमतही असते, टीव्ही मालिकेच्या कलाकारांसाठी ती किमंत त्यांच्या भरपूर मेहनतीतून चुकती करावी लागते, तेव्हा फळ मिळते. कलाकारांना जरी त्यांच्या कामाचे भरपूर पैसे दिले जात असले तरी त्यांचं काम मेहनतीचं असतं. हे गमक ओळखून सुरुची अडारकर मेहनत करताना दिसत आहे.

मुंबई : कलाकारांसाठी कामाचे वाढलेले तास हा एक मुख्य त्रास असतो आणि अनेकवेळा अनेक कलाकार भरपूर कामाच्या त्रासामुळे मालिकाही सोडतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एपिसोड असतील तर तेवढा त्रास नसतो पण जर 'डेली सोप' असेल तर मात्र कलाकारांची अगदीच हाल होत असतात. 'ती'ने चक्क ८४ तास काम केलंय! 'ती'चं नाव आहे सुरुची अडारकर.

अशीच स्थिती सध्या अंजली मालिकेच्या सुरुची अडारकरची झाली. मालिका सोमवार २२ मेपासून सुरू होत आहे. पण अजूनही अनेक गोष्टींचे शूटिंग वेळेअभावी पूर्ण झाले नाही. सकाळी ९ वाजता लागलेली शिफ्ट साधारणतः रात्री ९ वाजता म्हणजेच १२ तासांनी संपते. मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे एपिसोडची पूर्ण बँकिंग अजून तयार झालेलं नाही. ह्या गोष्टीचे महत्व सुरुचीला नीट समजत असल्यामुळे ह्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी तिनेच स्वीकारली आहे. प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये आणि मालिकेच्या एपिसोडचे जास्तीत जास्त बँकिंग व्हावे केवळ याकरिता सुरुची तुफान जोमाने कामाला लागली आहे. गेल्या आठवड्यात पूर्ण उत्साहाने तिने चक्क ८४ तास काम केलंय. 

तिचीही मेहनत बघून दिग्दर्शक चंद्रकांत कणसे आणि तिचे इतर सहकलाकार सुद्धा भारावून गेले आहेत. सुरुची अंजलीच्या भूमिकेत इतकी समरस झाली आहे की सेटवर सुद्धा सगळेच तिला तुफानी अंजली या नावानेच हाक मारतात आणि अंजली सुद्धा अगदी हसून न थकता प्रेक्षकांसाठी काम करायला तयार असते. आता तिची ही मेहनत प्रेक्षकांच्या मनाला किती भिडते हे सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता 'झी युवा'वरच समजेल.  

मनोरंजन

सुरत : गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी...

04.45 PM

मुंबई : अश्विनी भावे हे सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव गेली २ दशके या क्षेत्रात कार्यरत आहे. तिने केलेल्या सर्वच भूमिका या...

04.12 PM

मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कुलस्वामिनी या मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची नुकतीच एंट्री झाली आहे. बालकलाकार आर्यन मेघजी या...

03.36 PM