हममें से एकही बचेगा; कंगना-आदित्य वाॅर जोरावर

टीम ई सकाळ
रविवार, 17 सप्टेंबर 2017

एका खासगी टीव्ही शोच्या कार्यक्रमात कंगना राणावतने आदित्य पांचोलीचं नाव घेऊन अनेक आरोप लगावले. तो आपला कसा मानसिक, शारीरिक छळ करत होता याचे दाखले तिने दिले आणि आदित्य पांचोलीकडे अवघ्या भारताचं लक्ष गेलं. सुरज पांचोली आणि जिया खान प्रकरण अद्याप कोर्टात चालू असतानाच कंगनाने नवा विषय सुरू केला आणि पांचोली कुटुंबं पुन्हा चर्चेत आलं. सुरूवातीला आदित्यने हे प्रकरण सबुरीने घेतलं. कंगना चांगली अभिनेत्री आहे, पण तिने असं वक्तव्य का केलं याची काहीच कल्पना नसल्याचे दाखले त्याने दिले. पण आता मात्र तो पुरता इरेला पेटल्याचं दिसतं. 

मुंबई : एका खासगी टीव्ही शोच्या कार्यक्रमात कंगना राणावतने आदित्य पांचोलीचं नाव घेऊन अनेक आरोप लगावले. तो आपला कसा मानसिक, शारीरिक छळ करत होता याचे दाखले तिने दिले आणि आदित्य पांचोलीकडे अवघ्या भारताचं लक्ष गेलं. सुरज पांचोली आणि जिया खान प्रकरण अद्याप कोर्टात चालू असतानाच कंगनाने नवा विषय सुरू केला आणि पांचोली कुटुंबं पुन्हा चर्चेत आलं. सुरूवातीला आदित्यने हे प्रकरण सबुरीने घेतलं. कंगना चांगली अभिनेत्री आहे, पण तिने असं वक्तव्य का केलं याची काहीच कल्पना नसल्याचे दाखले त्याने दिले. पण आता मात्र तो पुरता इरेला पेटल्याचं दिसतं. 

कंगनाने त्या शोमध्ये माझी अब्रू वेशीला टांगली. तिच्या विरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. एकतर तिने त्याच कार्यक्रमान विनाअट माझी माफी मागायला हवी किंवा मी कोर्टात जाईन. तिने माझ्यावर केलेले सगळे आरोप सिद्ध करावेत. अन्यथा एकतर तिला तरी तुरुंगात जावं लागेल किंवा मी तरी तुरूंगात जाईन अशी अत्यंत आक्रमक भाषा पांचोलीने वापरायला सुरूवात केली आहे. रविवारी सकाळी त्याने आपलं स्टेटमेंट माध्यमांना दिलं आहे. 

यावर पुन्हा कंगनाचं काय म्हणणं आहे ते विचारण्यासाठी तिच्याशी अनेक माध्यम प्रतिनिधी प्रयत्न करत आहेत, पण ती मात्र अजूनतरी यावर काही बोललेेली नाही. पण कंगनाला जवळून जाणणारे मात्र ती माफी मागणार नाही अशी भूमिका घेत आहेत. आता पांचोलीविरोधात तिच्याकडे बरेच पुरावे असतील अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

Web Title: aditya pancholi kangana ranaut split esakal news