आता अक्षय-सल्लूची दंगल 

After Salman, Shah Rukh, Saif and Akshay,
After Salman, Shah Rukh, Saif and Akshay,

नव्या वर्षाच्या सुरुवातीला "रईस'पाठोपाठ "काबील' चित्रपटानेही शंभर कोटीचा आकडा पार केला. 2017 मध्ये बड्या स्टारचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातील बहुतेक चित्रपट हंड्रेड करोड क्‍लबमध्ये जाणार हे नक्की. आमीर खानच्या "दंगल'ने तर बॉक्‍स ऑफिसचा गल्ला पार ढवळून टाकला. त्यानंतर आलेल्या शाहरूख खानच्या "रईस'ने अन्‌ हृतिक रोशनच्या "काबील'ने म्हणावे तसे यश मिळविले नसले, तरी 100 कोटी कमावले. आता तयार आहेत, अक्षय कुमार आणि सलमान खान... दोघेही आपले सिनेमे घेऊन तिकीट बारीवर दंगल करायला सज्ज झाले आहेत. 
यंदाच्या वर्षी अक्षयचे चार चित्रपट पाठोपाठ प्रदर्शित होत आहेत. येत्या शुक्रवारी त्याचा "जॉली एलएलबी- 2' येतोय. त्याचे प्रोमे तर भन्नाट दिसताहेत. तो तिकीट बारीवर निश्‍चितच चांगली कामगिरी करील, असे भाकीत ट्रेड गाईडस्‌नी व्यक्त केले आहे. सलमानचे "टायगर जिंदा है' आणि "ट्युबलाईट' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. "टायगर जिंदा है' डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल. कतरिना कैफ सल्लूची हिरोईन असल्याने त्याचे फॅन्स "टायगर जिंदा है' सुपरहिट करणार हे नक्की. "दंगल'ला धडक द्यायला सल्लू चक्क दोन सिनेमे घेऊन येतोय. त्याचा "ट्युबलाईट' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. सध्या तो त्याच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. संजय लीला भन्साळींचा बहुचर्चित "पद्मावती'ही नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण त्यात मूख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय रोहित शेट्टीचा "गोलमाल अगेन', रजनीकांतचा "रोबो 2.0', राजकुमार हिराणींचा संजय दत्तच्या बायोपिकवर आधारित चित्रपट, विद्या बालनचा "बेगम जान', आमीर खानचा "सिक्रेट सुपरस्टार्स', शाहरूख खानचा "द रिंग' आदी काही चित्रपट आहेतच. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com