अक्षय म्हणतो, एेश्वर्याच सर्वात मादक अभिनेत्री

गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

हिंदी इंडस्ट्रीत अभिनेत्रींमध्ये सर्वात सुंदर दिसण्याची चढाओढ लागलेली असते. सौंदर्याच्या संकल्पनांना दोन अभिनेत्रींनी नवा आयाम दिला. त्यापैकी एक होती सुश्मिता सेन आणि दुसरी होती एेश्वर्या राय. पुढे सुश्मिता सेनने इंडस्ट्रीपासून चार हात लांब जाणं पसंत केलं. तिथे एेश्वर्याने मात्र सातत्याने नवे सिनेमे देत आपलं फॅनफाॅलोईंग कायम ठेवलं.

मुंबई : हिंदी इंडस्ट्रीत अभिनेत्रींमध्ये सर्वात सुंदर दिसण्याची चढाओढ लागलेली असते. सौंदर्याच्या संकल्पनांना दोन अभिनेत्रींनी नवा आयाम दिला. त्यापैकी एक होती सुश्मिता सेन आणि दुसरी होती एेश्वर्या राय. पुढे सुश्मिता सेनने इंडस्ट्रीपासून चार हात लांब जाणं पसंत केलं. तिथे एेश्वर्याने मात्र सातत्याने नवे सिनेमे देत आपलं फॅनफाॅलोईंग कायम ठेवलं. आजही एेश्वर्याचे जगभर फॅन आहेत. इंडस्ट्रीही त्याला अपवाद नाही. इत्तेफाकच्या निमित्ताने झालेल्या गप्पांत अक्षय खन्नाने पुन्हा एकदा एेश्वर्याच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. 

तिच्याबद्दल बोलताना तो म्हणाला, 'एेश्वर्या आणि मी अनेकदा एकत्र काम केलं आहे. पण माझ्या मते सर्वात मादक अभिनेत्री आजही तीच आहे. मी जेव्हा केव्हा तिला भेटलो तेव्हा तिच्या चेहऱ्यावरून माझी नजर हटत नव्हती. मला आठवतंय, मी तिच्याकडे सतत पाहात राहायचो. अर्थात मलाही ते खूप अवघडल्यासारखंच होतं. तिला याची सवय असावी. कारण आपण सतत एखाद्या व्यक्तीकडे नजर रोखून पाहात नाही. तिच्याबाबतीत काय बोलावं. अनेक लोक तिच्याकडे पाहात असतात. कारण ती सुंदरच दिसते.'