शिव साक्षीने चित्रपट स्वीकारला 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

निर्माते भूषण कुमार "मुगल - द गुलशन कुमार स्टोरी' हा चित्रपट काढणार आहेत. त्यात गुलशन कुमार यांची व्यक्तिरेखा अक्षय कुमार साकारणार आहे. सध्या अक्षय इंदूरमध्ये "पॅडमॅन'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. गुलशन कुमार हे शिवभक्त होते. त्यामुळे अक्षयने भूषण यांना, इंदूरमधील महेश्‍वर येथील 300 वर्षे जुन्या शिवमंदिरात या चित्रपटाचे व्यवहार पूर्ण करूया, असे सांगितले. त्यानुसार अक्षयने एका भल्या पहाटे शिवमंदिरात हा चित्रपट साईन केला. याबाबत भूषण म्हणाले की, "शिवमंदिरात माझ्या वडिलांवरील चरित्रपट साईन करणे माझ्यासाठी स्वप्नासारखे होते.' 