वरुण-आलियाचा चौकार 

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जून 2017

वरुण धवन आणि आलिया भट्ट यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री आपण त्यांच्या "स्टुडंट ऑफ द इयर'पासून "बद्रीनाथ की दुल्हनियां'पर्यंत बघितली. "स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून या दोन्ही स्टार किड्‌सनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

भलेही त्यांच्यामागे सपोर्ट असला तरी दोघांनी अभिनय क्षेत्रात आपली चुणूक दाखवून दिली. आलियाने तर "उडता पंजाब'मध्ये केलेली कमाल पाहून तिच्यासमोर चित्रपटांची रांग लागली. या दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहून त्यांच्यात काहीतरी चालू असल्याच्या अफवाही आल्या आणि या दोघांनीही त्या नाकारत आम्ही फक्त चांगले "फ्रेंड्‌स' आहोत, असे सांगितले. वरुणने तर "आलियाची आणि माझी केमिस्ट्री लोकांना आवडते ही चांगली गोष्ट आहे,' असेही म्हटले. "स्टुडंट ऑफ द इयर', "हम्प्टी शर्मा की दुल्हनियां', "बद्रीनाथ की दुल्हनियां' या तीन चित्रपटांनंतर आलिया आणि वरुण आणखी एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत.

"शिद्दत' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे काम पुढील वर्षी चालू होईल, असे सांगण्यात येत आहे. दिग्दर्शक अभिषेक बर्मन या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. या चित्रपटात अर्जुन कपूरच्या नावाची चर्चा आहे; पण अजूनही काही निश्‍चित झालेले नाही. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.