अलिया भट अडकली पतियालामध्ये

टीम ई सकाळ
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

सोमवारचा संपूर्ण दिवस गाजला तो गुरमित राम रहिमच्या शिक्षेमुळे. गुरमित राम रहिमला नेमकी काय शिक्षा होणार आणि त्याचा काय परिणाम पंजाब, हरियाणामध्ये होणार याकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले होते. त्याचवेळी बाॅलिवूडची सिनेतारका अलिया भट मात्र पतियालामध्ये अडकली. सध्या ती राझी या चित्रपटाचे शूट तिथे करत आहे. 

पतियाला: सोमवारचा संपूर्ण दिवस गाजला तो गुरमित राम रहिमच्या शिक्षेमुळे. गुरमित राम रहिमला नेमकी काय शिक्षा होणार आणि त्याचा काय परिणाम पंजाब, हरियाणामध्ये होणार याकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले होते. त्याचवेळी बाॅलिवूडची सिनेतारका अलिया भट मात्र पतियालामध्ये अडकली. सध्या ती राझी या चित्रपटाचे शूट तिथे करत आहे. 

अलियाचे राझी या चित्रपटाचे शूट अद्याप संपलेले नाही. परंतु अलियाच्या तारखा झाल्यानंतर ती मुंबईस काही दिवसांसाठी परतणार होती. परंतु, गुरमित राम रहिमला होणाऱ्या शिक्षा आणि घडणाऱ्या हिंसक घटना लक्षात घेऊन हाॅटेल प्रशासनाने अलियाला हाॅटेलमध्येच थांबण्याचा सल्ला दिला. अर्थात ती एकटी नसून, तिच्यासोबत राझी या चित्रपटाची टीमही हजर आहे. काही दिवसांपूर्वी गुरमित राम रहिमला अटक झाल्यानंतर उसळलेल्या दंग्यात 32 जणांचा मृत्यू झाला होता. 

पतियाला येथून न निघता आल्याने मुंबईतील तिचे दोन इव्हेंट रद्द करण्यात आल्याचेही कळते. परंतु त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.