अमिताभ यांनी गायली आरती 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

राम गोपाल वर्माचा "सरकार-3' हा चित्रपट काही ना काही कारणांमुळे प्रदर्शनासाठी पुढे ढकलला जात होता; पण हा चित्रपट आता काही दिवसांतच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आपल्या सुभाष नागरे म्हणजेच अमिताभ बच्चन यांना परत एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात मुख्य म्हणजे अमिताभ बच्चन यांनी गणेश आरती स्वतः गायली आहे. यापूर्वी त्यांनी बागबान, वजीर अशा चित्रपटांतून गाणी गायली आहेतच; तसेच मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील आरतींनाही अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे. सरकार-3 मध्ये असलेली गणेश आरती रोहन विनायक यांनी कंपोज केली आहे; तर मुंबईच्या समुद्रकिनारी गणपती विसर्जनाचा सीन या आरतीसाठी चित्रीत केलेला आहे.