अनिकेत अन पल्लवीची जोडी जमणार

टीम ई सकाळ
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई : जीवनानुभव देणाऱ्या चित्रपटांचे प्रेक्षकांनी नेहमीच चांगले स्वागत केले आहे. जी कुमार पाटील एंटरटेण्मेंट प्रस्तुत तू तिथे असावे हा असाच समृद्ध करणारा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच कलाकार, तंत्रज्ञ व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये संपन्न झाला. 

एखादा क्षण किंवा घटना आपलं आयुष्य क्षणार्धात बदलू शकते, अशावेळी खंबीरपणे उभं राहत आपली स्वप्न साकारणाऱ्या एका जिद्दी तरुणाची कहाणी तू तिथे असावे या चित्रपटात मांडण्यात आली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या थेट हृदयाला भिडेल असा विश्वास निर्माते व दिग्दर्शक यांनी याप्रसंगी व्यक्त केला. 

अनिकेत विश्वासराव, पल्लवी पाटील, विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची पटकथा व संवाद आशिष राखुंडे यांचे आहेत. संगीत दिनेश अर्जुना याचं आहे.