आण्णाभाऊ साठे नाट्यगृहात फटाके.. केक अन कचरा!

annabhau sathe fire inside esakal news
annabhau sathe fire inside esakal news

पुणे : खरेतर नाट्यगृहे ही त्या त्या शहराच्या जडणघडणीची सांस्कृतिक केंद्रे असतात असे म्हटले जाते. म्हणूनच शहरातील नाट्यगृह जेवढे अद्ययावत तेवढी या शहरातील सांस्कृतिक जडणघडण पक्की असे मानले जाते. पुण्याला तर कलांचे माहेरघर म्हटले जाते. नाट्यक्षेत्रातील पुण्याचे योगदान मोठे अाहे, असे असताना रंगदेवतेला लाजवेल अशी घटना पुण्यातील आण्णाभाऊ साठे नाट्यगृहात घडली आहे. सिनेदिग्दर्शक शेखर नाईक यांनी फेसबुकर या घटनेला वाचा फोडली. राजकीय ने्याचा वाढदिवस या नाट्यगृहात साजरा झालाच शिवाय येथे झालेला कचरा, वाढल्या गेलेल्या पंगती यांचाही पाढा वाचण्यात आला आहे. 

8 आॅक्टोबरला शेखर नाईक प्राॅडक्शन्सच्या गुरू गीता या कार्यक्रमाचे आयोजन आण्णाभाऊ साठे नाट्यगृहात करण्यात आले होते. हा कार्यक्रम रात्री साडेनऊ वाजता होता. त्याची रीतसर जाहीरातही करण्यात आली होती. पण तो कार्यक्रम होण्याआधी या नाट्यगृहात वाढदिवस साजरा होत असल्याचे दृश्य शेखर नाईक यांना दिसले. ते म्हणाले, माझ्या कार्यक्रमाची वेळ साडेनऊची होती, म्हणजे सा़डेआठ वाजता नव्या सत्राला हे थिएटर द्यावं लागतं. मी या नाट्यगृहात आल्यावर मला दिसलं की आत प्रवेश केल्याकेल्या प्रेक्षागृहाआधी जो पॅसेज आहे, तिथे बुफे लाागला आहे. साधारण दोनशे, तीनशे लोकांचे ते जेवण होते. हा प्रकार पाहून मी आवाक झालो. मग मी मॅनेजर भोसले यांच्याशी बोललो, ते म्हणाले, त्यांना केवळ अंध कलाकार गाणार आहेत व त्यांच्यासाठी बुफे लावत असल्याची कल्पना होती. खरेतर ते खोटे बोलत होते. कारण या कार्यक्रमाची सर्व कल्पना नाट्यगृहाच्या अधिकाऱ्यांना होती. मग मी आरडाओरड केल्यावर साईडच्या पॅसेजमध्ये हे बुफे लावले. तुम्सी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहू शकता. हे सर्व साडेनऊ वाजेपर्यंत चालू होतं. स्टेजवर तर आम्ही आमच्या कार्यक्रमाची लेव्हल लावायला घेतली तरी, एक विंग आडवी लावून जेवणावळी चालू होत्या. स्टेजवर सेलिब्रेशन सुरू होते. फटाके, केक असे सर्व.. याला कोणीही आटकाव केला नाही. नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांनीच ही बाब कॅमेऱ्यात शूट केली.'

नाईक यांनी याची रीतसर पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. ते म्हणतात, नाट्यगृहात स्टेजवर कलाकारांना साधा चहा सुद्धा नेऊ देत नाहीत, विंगेत जाऊन घ्यावा लागतो, 8 ऑक्टोबर ला आण्णाभाऊ साठे नाट्यगृहमध्ये स्टेजवर वाढदिवस साजरा झाला, केक कापला गेला, त्यानंतर फटाके वाजवले गेले, यात आणखीन भर म्हणजे आलेल्या सर्वाना जेवण दिले गेले. रात्रीचे सत्र दुसऱ्या कार्यक्रमाला दिलेले असतानाही अशी परवानगीच कशी दिली जाते आणि त्यावर आपल्याला त्यांनी थिएटर दिले याचे आपणच आभार मानायला हवे, असा संवाद होतो, नाट्यगृह असे नाव तरी का देतात ? लग्न, मुंज, वाढदिवस सभागृह असेच म्हणावे, video पहा अंदाज येईलच ! मात्र आपण काही बोलायचे नाही...असो !

हा प्रकार अत्यंत दयनीय असून, यावर मात्र अद्याप कोणीच काही भाष्य केलेले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com