भूमीचे बाबा अनुपम 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

अक्षय कुमारच्या वेगळेच नाव घेऊन येत असलेल्या आगामी चित्रपटाविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. "टॉयलेट- एक प्रेमकथा' हे त्या चित्रपटाचे नाव. ही प्रेमकथा आहे; पण टॉयलेटचा काय संबंध? ही उत्सुकता सगळ्यांना आहेच. या चित्रपटात अक्षय कुमार, भूमी पेडणेकर तसेच अनुपम खेरही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहेत. अनुपम खेरची नक्की भूमिका काय असणार, याबद्दल आतापर्यंत काहीच माहीत नव्हते; पण अनुपम खेर यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले की, ते भूमीच्या वडिलांची भूमिका करणार आहेत. भूमीप्रमाणेच तिच्या वडिलांनाही गावांत स्त्रियांसाठी टॉयलेट असावे असे वाटते. बाकीच्या गावांपेक्षा त्यांचे विचार पुढारलेले आहेत.

अक्षय कुमारच्या वेगळेच नाव घेऊन येत असलेल्या आगामी चित्रपटाविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. "टॉयलेट- एक प्रेमकथा' हे त्या चित्रपटाचे नाव. ही प्रेमकथा आहे; पण टॉयलेटचा काय संबंध? ही उत्सुकता सगळ्यांना आहेच. या चित्रपटात अक्षय कुमार, भूमी पेडणेकर तसेच अनुपम खेरही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहेत. अनुपम खेरची नक्की भूमिका काय असणार, याबद्दल आतापर्यंत काहीच माहीत नव्हते; पण अनुपम खेर यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले की, ते भूमीच्या वडिलांची भूमिका करणार आहेत. भूमीप्रमाणेच तिच्या वडिलांनाही गावांत स्त्रियांसाठी टॉयलेट असावे असे वाटते. बाकीच्या गावांपेक्षा त्यांचे विचार पुढारलेले आहेत. हा चित्रपट नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानावर असणारा आणि त्याला पाठिंबा देणारा थोडा उपहासात्मक चित्रपट आहे. अनुपम खेर यांचा अक्षय कुमारबरोबरचा हा 20 वा चित्रपट असणार आहे. 

Web Title: Anupam Kher, Akshay Kumar, Bhumi Pednekar, Toilet Ek Prem Katha