अनुरागने पोस्ट केला आपल्या जवळच्या मैत्रिणीचा फोटो

टीम ई सकाळ
बुधवार, 14 जून 2017

दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यप हा सतत चर्चेत असतो. आता तो चर्चेत आलाय ते एका फोटोमुळे. सोशल साईटवर त्याने त्याच्या मैत्रिणीसोबतचा एक फोटो अपलोड केलाय. तिचं नाव शुभ्रा शेट्टी असून तिची आणि अनुरागची मैत्री घनिष्ट असल्याचे बोलले जाते.

मुंबई : दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यप हा सतत चर्चेत असतो. आता तो चर्चेत आलाय ते एका फोटोमुळे. सोशल साईटवर त्याने त्याच्या मैत्रिणीसोबतचा एक फोटो अपलोड केलाय. तिचं नाव शुभ्रा शेट्टी असून तिची आणि अनुरागची मैत्री घनिष्ट असल्याचे बोलले जाते.

आता सोशल साईटवर अनुरागने पोस्ट केलेल्या फोटोवरून तर त्याची कल्पना येते. तिचं वय आत्ता 20 वर्षे असून अनुराग 44 वर्षांचा आहे. यापूर्वी अनुरागचे दोनदा लग्न झाले असून पहिल्या पत्नी पासून त्याला एक मुलगाही आहे. तर त्याने दुसरे लग्न अभिनेत्री कल्की कोयल्चीन हिच्यासोबत केले होते. पण त्यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला होता.