शाहरूखला अनुष्का वा़टते पुरणपोळीसारखी गोड

टीम इ सकाळ
सोमवार, 3 जुलै 2017

इम्तियाज अली दिग्दर्शित जब हॅरी मेट सेजल हा सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमाचं प्रमोशनही जोरावर आहे. अशावेळी अनुष्काच्या कामावरून शाहरूख भलताच खुश झालाय. रब ने बना दी जोडी या सिनेमातून अनुष्काने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर अनेकदा ते एकत्र आले. 

मुंबई : इम्तियाज अली दिग्दर्शित जब हॅरी मेट सेजल हा सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमाचं प्रमोशनही जोरावर आहे. अशावेळी अनुष्काच्या कामावरून शाहरूख भलताच खुश झालाय. रब ने बना दी जोडी या सिनेमातून अनुष्काने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर अनेकदा ते एकत्र आले. 

अनुष्का कशी वाटते यावर बोलताना शाहरुख म्हणतो, मला ती पुरणपोळीसारखी गो़ड वा़टते. ती खूप नाजूक आहेच. पण ती कधीच कुणाला दुखवत नाही. प्रत्येकाला समजून घेते. मला हे फार महत्वाचे वाटते. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त तिच्याबद्दल कुणीही प्रश्न विचारला की तिचं कोड कौतुक करण्यात शाहरूख कोणतीही कसूर करत नाहीय, हेच यातून सिद्ध होतं. 

टॅग्स