ई सकाळ Live : डाॅ. आशुतोष जावडेकर यांनी रंगवली शब्दसुरांची सुरेल मैफल

टीम ई सकाळ
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

पुणे : डाॅ. आशुतोष जावडेकर हे नाव संगीत रसिकांना आता नवे उरलेले नाही. पेशाने डेंटिस्ट असूनही आशुतोष यांनी आपल्या संगीताचा अभ्यास सचोटीने जोपासला आहे. केवळ भारतीयच नव्हे, तर पाश्चात्य संगीताचा, गायकांचा त्यांचा अभ्यासही दांडगा आहे. यासह त्यांनी लिहिलेली मुळारंभ ही कादंबरीही गाजली. त्याचे लय पश्चिमा हे पुस्तकही पसंतीस उतरले आहे. आपला सांगितिक प्रवास, त्यांनी नव्याने गाण्यात केलेले प्रयोग आदींबद्दल ई सकाळच्या एफबी पेजवर बुधवारी मैफल रंगली. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या लाईव्ह चॅटमध्ये सहभाग घेतला. अनेक प्रश्न विचारले आणि शंकांचं निरसनही करून घेतले. 

जवळपास पाऊणतास हा गप्पांचा कार्यक्रम चालू होता. बोलता बोलता आशुतोष यांनी नुसरत फतेह अली खान यांची मेरा पिया घर आयाापासून वेक अप सिद या चित्रपटातील एक तारा हे गाणेही गाऊन दाखवले. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरेही दिली. गाण्याचा रियाझ कसा करता यापासून स्वत: ला अपडेट कसे ठेवता असे प्रश्न त्यांनी विचारले. तर पाश्चात्य संगीताबाबतही विचारणा झाली. जस्टिन बिबर, सिलीन डीयाॅन, कंट्री म्युझिक आदी अनेक गाण्याच्या प्रकारबद्दल त्यांनी माहिती दिली. आजचे हिंदी सिनेसंगीत, मराठीतील गाण्याचे आजचे प्रवाह यावरही ते बोलते झाले. रसिकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. 

सध्या ते आणखी एका कादंबरीवर काम करत असून आणखी एक हिंदी सिंगल गाणे डिसेंबरपर्य़ंत आणण्याचा त्यांचा मानस आहे. तो त्यांनी खास ई सकाळच्या या कार्यक्रमात बोलून दाखवला. आपल्या आस, निर्धार, वीण या गाण्यांना रसिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले.