Ashram3 : 'तो' सीन शूट करताना मी खूप...; बॉबीने सांगितला शूटिंगचा किस्सा

तिसऱ्या सीझन मध्ये इशा गुप्ता आणि बाबा निराला म्हणजेच बॉबी देओल यांच्यातील इंटिमेंट सीन पाहायला मिळतात.
ashram 3
ashram 3Sakal

Ashram 3 : मागील काही दिवसांपूर्वी आश्रम चा तिसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. MX Player वर प्रदर्शित झालेल्या या वेबसिरिजला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. तिसऱ्या सिझनमध्ये आपल्याला इंटिमेट सीन पाहायला मिळाले. या वेबसिरीजमध्ये बाबा निराला (देओल) बॉबी, चंदन रॉय सन्याल (भोपा) आणि अदिती पोहनकर (पम्मी) व्यतिरिक्त, ईशा गुप्ता या व्यक्तिरेखा आहेत या सिझन मधील इंटिमेंट सीन शूट करतानाचा एक किस्सा बॉबी देओल यांनी सांगितला आहे.

(Ashram 3 News)

आश्रम सिरीजच्या तिसऱ्या सीझन मध्ये इशा गुप्ता आणि बाबा निराला म्हणजेच बॉबी देओल यांच्यातील इंटिमेंट सीन पाहायला मिळतात. हे सीन शूट करत असताना आपण खूप घाबरलो होतो असं बॉबी देओलने सांगितलं आहे. दरम्यान एका मुलाखतीत इंटिमेंट सीनच्या शूट बद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, "मला आठवते की मी पहिल्यांदा इंटिमेट सीन केला तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मी पहिल्यांदाच असे काहीतरी करत होतो," असे बॉबीने सांगितले. "इशाने असे खूप सीन केले आहेत तीने मला शूटच्या वेळी खूप मदत केली आणि व्यवस्थित शूट झालं." असं त्याने सांगितलं.

दरम्यान आश्रम मधील इंटिमेंट सीन शूटबद्दल बोलताना इशी गुप्ता म्हणाली की, "जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत 10 वर्षे काम करता तेव्हा असे सीन शूट करताना अस्वस्थ किंवा घाबरण्याच काहीही कारण नाही. काही लोकांना असे सीन शूट करताना घाबरल्यासारखं होतं पण मला तसं काही वाटलं नाही, तसं बघितलं तर प्रत्येक सीन कठीण असतो. जेव्हा तुम्ही स्क्रीन समोर काम करत असता तेव्हा ते कठीण असते मग तो कुठलाही सीन असो, रडण्याच किंवा ड्रायव्हिंग करण्याचा." असं इशा म्हणाली. पुढे ती म्हणाली की आता चित्रपटांपेक्षा ओटीटीवर येणाऱ्या सिरीजमध्ये असे सीन दाखवले जातात त्याचा आनंद प्रेक्षकांनी घेतला पाहिजे असंही ती बोलताना म्हणाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com