'बाहुबली : द कन्क्लुजन'चा ट्रेलर प्रदर्शित

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मार्च 2017

या चित्रपटाची कथा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारले, हे कोडे या चित्रपटातून उलघडणार आहे. प्रभास, राणा डुगुबत्ती आणि अनुष्का शेट्टी यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.

हैदराबाद - बहुप्रतीक्षित "बाहुबली : द कन्क्लुजन' या चित्रपटाचा ट्रेलर आज (गुरुवार) प्रदर्शित झाला असून, आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील चित्रपटगृहांमध्ये तो दाखविण्यात आला.  

आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये सकाळी नऊ वाजता हा ट्रेलर दाखविण्यात आला. त्याचप्रमाणे सायंकाळी पाच आणि आठ वाजता तो ऑनलाइन दाखविण्यात येणार आहे, असे दिग्दर्शक एस. एस. राजामोउली यांनी सांगितले. शोबू यारलागडा, कोवलमुडी राघवेंद्र राव आणि प्रसाद देविनेनी यांच्याबरोबर हा चित्रपट काढलेला असून, 2015 मध्ये सुपरहीट ठरलेल्या "बाहुबली 2' याचाच पुढचा भाग आहे. हा चित्रपट येत्या 28 एप्रिलला तमिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये संपूर्ण जगात प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

या चित्रपटाची कथा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारले, हे कोडे या चित्रपटातून उलघडणार आहे. प्रभास, राणा डुगुबत्ती आणि अनुष्का शेट्टी यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.

Web Title: Baahubali 2 - The Conclusion Trailer out

व्हिडीओ गॅलरी