राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भाऊराव कऱ्हाडेचा 'बबन' येतोय!

शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

समाजाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या "ख्वाडा" या अनेक मानाचे पुरस्कारप्राप्त चित्रपटाच्या यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे, एका तरुण शेतकऱ्याची प्रेमकथा बबन या चित्रपटातून घेऊन येत आहेत. या चित्रपटाची कथा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचीच आहे. या चित्रपटाच्या टीजर ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्यानंतर नुकतेच या चित्रपटातील 'साज ह्यो तुझा' हे रोमँटिक गाणे प्रसिद्ध करण्यात आले आणि अल्पावधीतच हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे. सुहास मुंडे यांनी लिहिलेल्या या गीताचे संगीतकार आणि गायक आहेत ओंकारस्वरूप. 
 
-बबन २९ डिसेंबर ला होणार प्रदर्शित

मुंबई : 'साज ह्यो तुझा, जीव माझा गुंतला...'  या सोप्या शब्दाआधी येणारी व्हायोलिन ची कर्णमधुर सुरावट, त्यावर बासरीचा सुंदर साज अशा या अवीट गाण्यावर हळुवारपणे ठेका धरायला लावणारा ताल आणि स्क्रीनवर दिसणारे सुंदर खेडेगाव, हिरवीगार शिवारे, याच गावातले कॉलेज आणि एका सुंदर मुलीवर भाळलेला,  शेती आणि दुग्धव्यवसाय करणारा,  चांदरातीला उशाखाली तिचा फोटो ठेवून प्रेम व्यक्त करणारा आजच्या काळातला शेतकरी तरुण. ही दृश्ये आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांच्या आगामी 'बबन' या रोमँटिक चित्रपटातल्या गाण्यातील.

बबन चित्रपटातील गाणे पाहा..

समाजाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या "ख्वाडा" या अनेक मानाचे पुरस्कारप्राप्त चित्रपटाच्या यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे, एका तरुण शेतकऱ्याची प्रेमकथा बबन या चित्रपटातून घेऊन येत आहेत. या चित्रपटाची कथा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचीच आहे. या चित्रपटाच्या टीजर ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्यानंतर नुकतेच या चित्रपटातील 'साज ह्यो तुझा' हे रोमँटिक गाणे प्रसिद्ध करण्यात आले आणि अल्पावधीतच हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे. सुहास मुंडे यांनी लिहिलेल्या या गीताचे संगीतकार आणि गायक आहेत ओंकारस्वरूप. 

हळुवार प्रेमभावना व्यक्त करणारे अतिशय श्रवणीय असे हे गाणे भाऊसाहेब शिंदे आणि या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जाधव यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. सुंदर लोकेशन्स, सतत गुणगुणावी वाटेल अशी सोपी चाल यामुळे ‘साज ह्यो तुझा’ हे गाणे तरुण पिढीचे पुढचे ‘लव्ह अँथम’ ठरले तर आश्चर्य वाटायला नको. चित्रक्षा फिल्म्स’ प्रस्तुत ‘बबन’ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट २९ डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.