बादशाहोचा ट्रेलर झाला रिलीज

टीम ई सकाळ
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बादशाहो या चित्रपटाचा ट्रेलर आज मुंबईत रिलीज झाला. या चित्रपटात अजय देवगण, इम्रान हाश्मी, विद्युत जामवाल, ईशा गुप्ता, एलिआना डिक्रुझ यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बादशाहो या चित्रपटाचा ट्रेलर आज मुंबईत रिलीज झाला. या चित्रपटात अजय देवगण, इम्रान हाश्मी, विद्युत जामवाल, ईशा गुप्ता, एलिआना डिक्रुझ यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

मिलन लुथारिया दिग्दर्शित या चित्रपटाची चांगली चर्चा झाली आहे. 1970 च्या दशकात घडणारा या सिनेमाला आणीबाणीच्या परिस्थितीची किनार आहे. मधुर भंडारकर यांच्या इंदू सरकारवेळी झालेला घोळ लक्षात घेता या सिनेमावेळी नेमकी काय स्थिती असेल हे आत्ता सांगता येणार नाही, पण याचा ताण निर्मात्यावर आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमातील राहत फतेह अली खान यांनी गायलेलं मजा आ गया हे गाणे तर यापूर्वीच लोकप्रिय झाले आहे. अजय देवगणचा पुन्हा एकदा रावडी अवतार त्याच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.