"बाहुबली : द कन्ल्युजन' चित्रपटाचे 16 ला ट्रेलर

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

येत्या 16 मार्चला आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये सकाळी नऊ वाजता हे ट्रेलर होणार आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी पाच आणि आठ वाजता तो ऑनलाइन दाखविण्यात येणार आहे

हैदराबाद - बहुप्रतीक्षित "बाहुबली : द कन्ल्युजन' या चित्रपटाचे आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये येत्या 16 मार्चला ट्रेलर होणार आहे. येत्या 16 मार्चला आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये सकाळी नऊ वाजता हे ट्रेलर होणार आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी पाच आणि आठ वाजता तो ऑनलाइन दाखविण्यात येणार आहे, असे दिग्दर्शक एस. एस. राजामोउली यांनी सांगितले.

शोबू यारलागडा, कोवलमुडी राघवेंद्र राव आणि प्रसाद देविनेनी यांच्याबरोबर हा चित्रपट काढलेला असून, 2015 मध्ये सुपरहीट ठरलेल्या "बाहुबली 2' याचाच पुढचा भाग आहे. हा चित्रपट येत्या 28 एप्रिलला तमिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये संपूर्ण जगात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे.