बुकमायशो आता मराठीतही उपलब्ध

book myshow is in marathi esakal news
book myshow is in marathi esakal news

मुंबई : बुकमायशो या भारतातील सर्वात मोठय़ा ऑनलाइन करमणुक तिकिटे मिळणा-या ब्रँडने आता त्यांच्या बहुभाषीय इंटरफेसमध्ये आणखी चार प्रादेशिक भाषा जोडल्या आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि इंग्रजीसोबतच वापरकर्त्यांना आता बुकमायशोच्या वेबसाइटवर आणि अँड्रॉइड अॅप्समध्ये मराठी भाषेचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. मराठीसह मल्याळम, गुजराती आणि पंजाबी या भाषांचा समावेशही यात करण्यात आला आहे. 
 
 भाषेच्या अडथळ्यामुळे या भाषांची आवृत्ती लाँच करण्यात आली आहे. वापरकर्त्‍यांना भाषेच्‍या अडचणींवर मात करता यावी आणि सर्वत्र पसरलेल्‍या,  विशेषत: द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये राहणा-या युजर्सना त्‍यांच्‍या पसंतीच्या भाषेत बुकमायशो अधिक सोईस्‍कर पद्धतीने वापरता यावे यासाठी हे भाषेचे पर्याय उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत.
 
रवदीव चावला, उत्पादन प्रमुख, बुकमायशो, म्हणाले, "भारतातील ई-कॉमर्स विकासाच्या पुढील टप्प्यात भाषा एक गंभीर अडथळा आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी आणि ऑनलाईन मनोरंजनाची तिकीट सुविधा सर्वांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही बहुभाषी इंटरफेसचा विस्तार केला आहे. बुकमायशो वर मराठी, गुजराती, मल्याळम आणि पंजाबी भाषेला पसंती देणार्‍यांना आता मुक्तपणे या व्यासपीठाचा वापर करता येणार असून आम्ही देत असलेल्या  विविध मनोरंजन पर्यायांचा अनुभव घेता येणार आहे.''
 
"बहुभाषी इंटरफेस विकसित करताना, आम्ही वापरकर्त्यांना आलेल्या अनुभवांच्या लहान तपशीलावर देखील लक्ष दिले आहे. मागील काही महिन्यांमध्ये इंग्रजीव्यतिरिक्त आम्ही दिलेल्या इतर भाषेच्या पर्यायांचा लाखो वापरकर्त्यांनी केलेला वापर हा आमच्‍यसासाठी उत्साहवर्धक आहे. आम्हाला खात्री आहे की अधिक भाषांचा समावेश केल्याने आम्हाला बाजारपेठ वाढविण्यास मदत होईल ", असेही ते म्हणाले. नवीन भाषेचे पर्याय लवकरच आयओएस अॅपवर उपलब्‍ध करून दिले जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com