ब्रॅड पीटची कबुली 

वृत्तसंस्था
रविवार, 7 मे 2017

ब्रॅड पीट आणि अँजेलिना जोली या हॉलीवूडच्या हॉट जोडीचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांचे लाखो चाहते हळहळले होते. त्यानंतर त्यांचा घटस्फोट होईपर्यंत दोघांनीही मौन पाळले होते. मध्यंतरी त्यांच्या सहा मुलांच्या ताब्यावरून भांडणेही झाली होती; पण आता इतक्‍या दिवसांनंतर ब्रॅड पीटने त्यांचा घटस्फोट का झाला याचे कारण सांगून त्याच्या चुकीची कबुली दिली आहे.

तो म्हणतो माझ्या जास्त दारू पिण्याच्या सवयीमुळेच घटस्फोट झाला. माझी चूक माझ्या लक्षात आली आहे. मला जगातली सगळ्यात चांगली पत्नी मिळूनही मी दारूच्या आहारी गेलो. एक वेळ अशी आली की, मी खूपच अस्वस्थ झालो होतो. त्या वेळी मी माझ्या मित्रांच्या घरी अक्षरश: सहा आठवडे दारू पीत बसलो होतो. त्यामुळेच माझ्या पत्नीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.' सध्या ब्रॅड त्याचे व्यसन सोडविण्यासाठी उपचार घेत आहे. त्याबद्दल तो खूप खूशही आहे. त्याने आता दारू सोडल्याचे तो सांगतो. 

Web Title: Brad Pitt confessed