चाहूल २ मालिकेमध्ये सर्जाचा चेहराच उलघडणार वाड्यातील रहस्य

बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

चाहूल २ मालिकेमध्ये खरी शांभवी म्हणजेच राणी वाड्यामध्ये पोहचली असून खोटी शांभवी तिला सर्जापासून दूर ठेवण्याचे बरेच प्रयत्न करत आहे. सर्जाला सत्य पटवून देण्यात राणीला अजूनही यश मिळाले नाही तसेच सर्जाला राणी अजूनही शांभवीच्या तावडीतून सोडवू शकलेली नाही.

मुंबई : चाहूल २ मालिकेमध्ये खरी शांभवी म्हणजेच राणी वाड्यामध्ये पोहचली असून खोटी शांभवी तिला सर्जापासून दूर ठेवण्याचे बरेच प्रयत्न करत आहे. सर्जाला सत्य पटवून देण्यात राणीला अजूनही यश मिळाले नाही तसेच सर्जाला राणी अजूनही शांभवीच्या तावडीतून सोडवू शकलेली नाही.

या सगळ्यामध्ये वाड्यात अजून एक विचित्र गोष्ट घडली आहे ती म्हणजे सर्जा सारखाच दिसणारा दुसऱ्या व्यक्तीचा देखील वाड्याशी संबंध आहे हे सर्जाच्या लक्षात आले आहे ज्याचे नाव साहेबराव आहे. साहेबराव हा सुरेखाचा नवरा असून तो वाड्यामधून गायब आहे. सर्जाचा रोल करत असलेल्या अक्षर कोठारी या साहेबरावच्या लुक मध्ये अगदीच वेगळा दिसत आहे ज्यामध्ये अक्षरला पगडी, jacket, कुर्ता, धोतर आणि कपाळावर लाल टिळा देण्यात आला आहे. त्यामुळे आता तुमचा लाडका सर्जा एका नव्या लुक आणि रोलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चाहूल २ मालिकेमध्ये. हा साहेबराव वाड्यातून गायब का झाला ? सुरेखा त्याच्या फोनवर काय बोलत असते ? आता सर्जाचा चेहराच उलघडणार का हे वाड्यातील रहस्य ? अश्या अनेक निरुत्तरीत प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत तेंव्हा बघायला विसरू नका चाहूल २ कलर्स मराठीवर सोम ते शनि रात्री १०.३० वा.
 
सर्जाला वाड्यातील एका पेटी मध्ये साहेबरावचा फोटो मिळतो आणि त्याला प्रश्न पडतो कि हा माणूस हुबेहूब माझ्यासारखाच दिसतो पण हा कोण आहे हे त्याला माहिती नसते. साहेबराव आणि सर्जा यांच्या राहणीमानात, त्यांच्या कपड्यात आणि बोलण्याच्या पद्धतीत फरक असला तरी या दोघांचे चेहरे मात्र सारखेच आहेत. 

हे सगळे जाणून घेण्यासाठी बघा चाहूल २ कलर्स मराठीवर सोम ते शनि रात्री १०.३० वा.

टॅग्स