'सलमान सोसायटी' बच्चे कंपनीची

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार मराठीत बच्चे कंपनीला घेऊन एक नवा प्रयोग करत आहेत. ‘सलमान सोसायटी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली. ‘पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.

‘सलमान सोसायटी’ हा चित्रपट बाल शिक्षणावर भाष्य करणारा असेल. या चित्रपटात बालकलाकारांची धमाल प्रेक्षकांना अनुभवता येईल. पुष्कर लोनकर, शुभम मोरे, गौरव मोरे आणि विनायक पोतदार हे बालकलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. याआधीही पुष्करने एलिझाबेथ एकादशी, चि. व चि.सौ.कां अशा अनेक मराठी सिनेमांत काम केलं आहे, तर शुभमने मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांतदेखील कमालीची कामगिरी केली आहे. आता ‘सलमान सोसायटी’ चित्रपटात ही बच्चे कंपनी काय कमाल करणार, हे पाहणं औत्सुक्‍याचं ठरणार आहे.

Web Title: children in salman society marathi movie