त्यांचा बाहुबली तर आपला 'भाऊबली'!

टीम ई सकाळ
गुरुवार, 8 जून 2017

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट' , 'सैराट'पर्यंत आणि हिंदीतील 'तिरंगा', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे. आणि आता या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'बाहुबली २' या चित्रपटाचं मराठमोळं रुप.

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट' , 'सैराट'पर्यंत आणि हिंदीतील 'तिरंगा', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे. आणि आता या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'बाहुबली २' या चित्रपटाचं मराठमोळं रुप.

‘बाहुबली’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक नवनवे विक्रम रचले. बाहुबली २ ची ही लोकप्रियता बघता थुकरटवाडीकरांनीही मग प्रेरणा घेत ‘भाऊबली’ हा चित्रपट बनवला. ज्यात भाऊबलीच्या मुख्य भूमिकेत भाऊ कदम, देवसेनेच्या भूमिकेत श्रेया बुगडे, भल्लाळदेवच्या भूमिकेत अंकुर, शिवगामीच्या भूमिकेत सागर कारंडे तिचा पती बिजालदेवच्या भूमिकेत भारत गणेशपुरे आणि कटप्पाच्या भूमिकेत कुशल बद्रिके बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे चित्रपटात ज्याप्रमाणे स्पेशल इफेक्ट्सचा खास वापर करण्यात आलाय तसाच वापर इथेही दिसणार आहे आणि त्याच्या सोबतीला असेल विनोदाचा जबरदस्त तडका. 

येत्या सोमवारच्या भागात म्हणजे १२ जूनला रात्री ९.३० वा. झी मराठीवर हे खास स्किट बघायला मिळणार आहे.

मनोरंजन

मुंबई :  गुरमित राम रहिमच्या कारनाम्यांनी अवघी दुनिया अचंबित झाली होती. त्याची संपत्ती, त्याचे सिनेमे आणि आता त्याला शिक्षा...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई : मुंबईत होणाऱ्या १९ व्या 'मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजेस' म्हणजेच मामि फिल्म फेस्टिव्हल'साठी सर्वनाम या मराठी सिनेमाची...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती या चित्रपटाची मोठी चर्चा झाली. रणवीर सिंग, दीपिका पदुकोन, शाहीद कपूर हे तिघे या...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017